मुंबई :  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणी (Baba Siddique Murder Case) लॉरेन्स बिश्नोईची (Lawrence Bishnoi Gang) चौकशी होण्याची शक्यता आहे. या हत्येमागे  बिश्नोई गँगचा हात असल्याचे  समोर आला आहे. त्यामुळे  बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईची  चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक साबरमती कारागृहात जाऊन चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे. 


पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील मास्टरमाइंड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांची गँग आता महाराष्ट्रात सक्रिय झाली आहे. त्याच्या गँगने सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी हत्या घडवून आणली.  सलमान खानचे जवळचे संबंध असणाऱ्या माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारीही बिश्नोई गँगने स्वीकारली आहे.त्यासंदर्भातच चौकशी करण्यासाठी  लॉरेन्स बिश्नोईची चौकशी होण्याची शक्यता आहे.  मुंबई पोलिसांचं विशेष पथक साबरमती कारागृहात जाऊन चौकशी करणार आहे.


लॉरेन्स सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी


 गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरामधील साबरमती कारागृहात आहेत.  लॉरेन्स बिश्नोई सध्या साबरमती कारागृहातील सर्वात सुरक्षीत अंडा सेलमध्ये कैद आहे. बिष्णोई यांच्या सेलभोवती सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. वारंवार प्रयत्न करूनही मुंबई पोलीसांना  लॉरेन्स बिश्नोईची पोलीस कोठडी मिळाली नाही.  कारण सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे.


लॉरेनची पोलीस कोठडी मिळण्यात अडचणी


लॉरेनची पोलीस कोठडी मिळाली यासाठी मुंबई क्राइम ब्रँचकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांना ती मिळाली नाही. केंद्रीय गृहविभागाने काढलेल्या एका आदेशामुळे मुंबई पोलिसांना लॉरेनची कोठडी मिळण्यात अडचणी येत आहेत येत आहेत .  केंद्रीय गृहविभागाच्या या आदेशानुसार लॉरेन्सला एका तुरुंगात दुसरीकडे हलवण्यात प्रतिबंध आहेत . बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात बिश्नोई गैंगचा सहभाग प्राथमिक पातळीवर स्पष्ट होत असल्याने मुंबई पोलीस काही दिवसानंतर लॉरेन्सच्या कोठडीसाठी पुन्हा प्रयत्न करणार आहे.   लॉरेन्सच यामागे मुख्य सूत्रधार आहे हे स्पष्ट झाल्यानंतर मुंबई पोलीस करणार प्रयत्न  करणार आहेत. 


सिद्दिकींच्या हत्येबाबत सोशल मीडियावर पोस्ट


बाबा सिद्दिकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगनं सिद्दिकींची हत्या केल्याचं समोर आलं. यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टही करण्यात आली. ही पोस्ट व्हायरल झाली आहे. शुब्बू लोणकर नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीनं बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये सलमान खान आणि दाऊद गँगचाही उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांकडून या पोस्टसंदर्भात अधिक तपास सुरू आहे. 


हे ही वाचा :


Baba Siddique Murder Case: "24 तासांत तुझं फालतू नेटवर्क संपवून टाकीन..."; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईला अपक्ष खासदाराचं खुलं आव्हान