मुंबई : कोरोना काळात भरघोस आलेल्या बिलांबाबत राज्य सरकार सवलत देण्याची शक्यता मावळली आहे. कारण महावितरणने वीज बिल वसुलीसंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. त्यामुळे वीज बिल वसुली करण्याचे निर्देश महावितरणने दिले आहेत. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
महावितरणने दिलेली बिलं कशी योग्य आहेत हे ग्राहकांना समजवून सांगावे, अशी सूचनाही महावितरणने कर्मचाऱ्यांना केली आहे. ग्राहकांच्या प्रत्येक जागेवर जाऊन मीटर वाचन, वीज बिल छपाई आणि वीज बिल वाटप सुरू होणार आहे. वीज बिल वसुलीसाठी मेळावे घ्यावे. वीज ग्राहकांना टप्याटप्याने वीज बिल भरण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. तसेच एकाचवेळी तोडगा काढून वीज बिल ग्राहक भरू शकतील.
महावितरणचा कॅश फ्लो सुधारण्यासाठी ग्राहकांकडून थकबाकी तसेच चालू वीज बिल वसुली सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. सदर वीज बिल वसुली मोहीम राबवताना कोविड –19 मुळे उद्भवलेली प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा महावितरणने ग्राहकांना अखंडित पुरवठा करण्यासाठी केलेले प्रयत्न ग्राहकांच्या निदर्शनात आणून देण्यात यावे. तसेच ग्राहकांना हे देखील स्पष्ट करावे की आर्थिक अडचणींमुळे महावितरणला दररोजच्या संचलन आणि सुव्यवथथेसाठी लागणाऱ्या खर्चीची पूर्तता करणे कठीण झाले आहे. यामुळे महावितरणच्या अखंडित वीजपुरवठा करण्याच्या प्रयत्नावर परिणाम होऊ शकतो.
संबंधित बातम्या
- वाढीव वीज बिलाबाबत राज्यपालांना निवेदन; शरद पवार, मुख्यमंत्र्यांचीही भेट घेईन : राज ठाकरे
- 2 वर्षांपासून घरात राहायला कोणी नाही, 8 महिन्यांपासून कनेक्शन तोडलं तरी वीजेचं बिल 3 लाख 44 हजार रुपये!
- शेतात वीज कनेक्शन नसतानाही महावितरणचं लाखांचं बिल
- वाढलेलं वीज बिल पाहून तापसी पन्नूला बसला 'शॉक', सोशल मीडियावर शेअर केलं वीज बिल