एक्स्प्लोर

शेतकरी संपाला पाठिंबा, शेतमालाची नासाडी करु नका : राजू शेट्टी

कोल्हापूर : राज्यातील शेतकरी संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाची नासाडी करुन आंदोलनाला हिंसक वळण लावू नये, असं आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. शेतकऱ्यांचा संप मिटेपर्यंत स्वाभिमानीचा दूध संघ बंद राहिल. राज्यातील इतर दूध संघांनी संघ बंद ठेवून सहकार्य करण्याची अपेक्षा आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले. बळीराजा का खवळला याचा विचार करायला पाहिजे. मान्सूनच्या तोंडावर शेतकरी आतून पेटलेला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वर्षांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही त्यावर विचार झालेला नाही, असं राजू शेट्टी म्हणाले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतमालाला भाव मिळत नाही. गरज नसेल तेव्हाही आयात केली जाते. त्याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतात, असंही राजू शेट्टींनी सांगितलं. राज्यभरातील शेतकरी संपावर राज्यभरात 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या काळात गावातून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही पाठवणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी संपावर जाणार असल्याचं सांगितलं. पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला होता. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता एक जूनपासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे. संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
  • शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.
  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.
  • शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.
  • शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी.
संबंधित बातमी :

शेतकरी संपाच्या आडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव : मुख्यमंत्री

नाव स्वाभिमानी आणि धंदे बेईमानी, रघुनाथदादांचा राजू शेट्टींवर घणाघात

शेतकऱ्यांनो संप मागे घ्या, सरकार चर्चेसाठी तयार : खोत

शेतकरी संपावर जाणं म्हणजे आई संपावर जाण्यासारखंच : अर्थमंत्री

शेतकरी संप : साताऱ्यात मुंबईला दूध घेऊन जाणारे दोन ट्रक फोडले

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 4th T20 : टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
Dominos Pizza Action : मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई
मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
Embed widget