Health Tips : राज्यात आजपासून पावसाला (Rainy Season) सुरुवात झाली आहे. या निमित्ताने कडक उन्हाळ्यापासून आपली सुटका झाली असं म्हणायला हरकत नाही. पावसाळा म्हटलं की अनेक आजारांना आमंत्रण सहज मिळतं. यासाठी फिट राहण्याबरोबरच आपण काय खातो याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही थोडेसेही चुकीचे अन्नपदार्थ खाल्ले तर तुम्हाला त्याचा दीर्घकाळासाठी त्रास होऊ शकतो. कारण या ऋतूमध्ये संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. बहुतेक जंतू आणि जिवाणू या ऋतूमध्ये वाढण्याची शक्यता असते. अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांशी संबंधित माहिती देणार ​​आहोत ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.


सीफूड : पावसाळ्यात सीफूडपासून दूर राहा कारण ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. खरंतर, पावसाळ्यात माशांचा प्रजनन काळ सुरु होतो. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेले मासे अनेकदा ताजे नसतात. अशा परिस्थितीत याचे सेवन करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.


पालेभाज्या : कोबी किंवा पालक हिरव्या पालेभाज्या पावसाळ्यात खाऊ नयेत. कारण त्यात बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव आढळतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो.


तळलेले पदार्थ खाणे टाळा : या हंगामात तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे चांगले नाही. यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्हाला अपचन आणि डायरियाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत याचे सेवन करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.


दुग्धजन्य पदार्थ : पावसाळ्यात दुग्धजन्य पदार्थांचे दही, ताक यांचे सेवन टाळावे, कारण पावसाळ्यात अन्नपदार्थांमध्ये बॅक्टेरिया फार लवकर वाढतात आणि दहीमध्ये आधीच बॅक्टेरिया असतात. जर तुम्ही रोज याचे सेवन कराल तर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात.


कोशिंबीर : कोशिंबीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी पावसाळ्यात कच्च्या भाज्या खाल्ल्याने आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. काही भाज्यांमध्ये बॅक्टेरिया असतात, ज्या कच्च्या खाल्ल्यास संसर्गाचा धोका वाढतो. या ऋतूमध्ये फक्त शिजवलेले अन्नच खावे.


जंक फूड : या हंगामात जंक फूडपासूनही अंतर राखले पाहिजे. रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या तळलेल्या पदार्थांपासून डेंग्यू मलेरियाचा धोका खूप वाढतो. या हंगामात पचनक्रिया मंदावते. म्हणूनच इडली, डोसा, जलेबी, दही वडा असे आंबवलेले पदार्थ खाऊ नयेत.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : फिट राहण्यासाठी फक्त जॉगिंग नाही...'रिव्हर्स वॉकिंग'सुद्धा फायदेशीर; जाणून घ्या आरोग्यासाठीचे फायदे