Tanvi Thakkar Baby Boy: छोट्या पडद्यावरील 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री तन्वी ठक्कर (Tanvi Thakkar) आणि तिचा पती आदित्य कपाडिया (Aditya Kapadia) हे आई-वडील झाले आहेत. तन्वी ठक्करनं 19 जून रोजी मुलाचा जन्म दिला आहे. नुकताच तन्वीनं न्यू बॉर्न बेबी बॉयसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांनी सोशल मीडियावर न्यू बॉर्न बेबी बॉयसोबतचा फोटो शेअर केला आहे. न्यू बॉर्न बेबी बॉयसोबतचा फोटो शेअर करत तन्वीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "सर्व इथून सुरू होते." तन्वीनं शेअर केलेल्या फोटोला कमेंट्स करुन नेटकऱ्यांनी तन्वी आणि आदित्यला शुभेच्छा दिल्या आहेत. वत्सल सेठ, किशोरी शहाणे, किश्वर मर्चेंट, मानसी श्रीवास्तव या सेलिब्रिटींनी देखील तन्वीनं शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या.
तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांनी साखरपुड्याला 7 वर्षे झाल्यानंतर 2021 मध्ये लग्न केले. आता 2023 मध्ये ते पालक झाले आहेत. आदित्य कपाडिया हा देखील अभिनेता आहे. त्यानं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.
'गुम है किसी के प्यार में' या मालिकेमुळे तन्वीला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेमध्ये तिनं शिवानी बुवाची भूमिका साकारली होती. कामिनी मल्होत्राच्या जागी ती शोमध्ये सामील झाली होती. या शोमध्ये बराच काळ काम केले आणि नंतर शोमध्ये लीप झाल्यानंतर तिने ते शो सोडण्याचा निर्णय घेतला.
‘गुम है किसी के प्यार में’ (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेत सई, पाखी आणि विराटची कथा दाखवण्यात आली आहे. सध्या या मालिकेमध्ये आयशा सिंह, नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत अभिनेत्री रेखा या देखील काम करतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: