एक्स्प्लोर

मनसेचा आक्रमक पवित्रा, शेतकरी मृत्यूप्रकरणी यवतमाळमध्ये तोडफोड

कीटकनाशकं फवारणी अनेक शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला.

यवतमाळ: कीटकनाशकं फवारणी अनेक शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये कृषी कार्यालयांमध्ये राडा घाताला. खुर्च्या फेकून, तोडफोड करुन, मनसेने अधिकाऱ्यांना जाब विचारला. कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड करण्यात आली. कीटकनाशकांच्या फवारणीनंतर यवतमाळ जिल्ह्यासह राज्यात 34 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. चिनी बनावटीचे फवारणी पंप वापरल्याने शेतकऱ्यांना विषबाधा? कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात 34 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. तर साडे पाचशेपेक्षा जास्त शेतकरी विषबाधा झाल्यामुळे उपचार घेत आहेत. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर यामागे चिनी बनावटीचे फवारणी पंप असल्याचं समोर आलं आहे. प्रशासनाकडून विषबाधा प्रकरणाचा शोध घेतला जात आहे. देशी बनावटीचे फवारणी पंप किंवा बॅटरीवर चालणारे स्वयंचलित पंप यांसोबत आता चिनी बनावटीचे फवारणी पंपही सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या पंपच्या सहाय्याने कमी वेळात जास्त एकराची फवारणी करता येते. त्यामुळे या पंपांना जास्त मागणी आहे. पेट्रोलवर चालणारा हा चिनी पंप मोठ्या प्रमाणात तुषार फेकतो. या पंपातून निघणारे तुषार हलके असल्याने ते हवेत जास्त काळ राहतात. शेतकऱ्यांनी पुरेशी काळजी घेतलेली नसेल तर यातूनच विषबाधा होते, असा निष्कर्ष समोर आला आहे. फवारणी करताना काय काळजी घ्याल? फवारणी करताना तोंडाला कापड लावलं तर श्वास घेता येत नाही. बूट घातले तर वजन घेऊन चालत येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेतली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उलटी, मळमळ, चक्कर येणे हा त्रास सुरू होतो. शेतकरी अनेकदा दिवसभर तापत्या उन्हात काम करतात. कीटकनाशकाचे डब्बे सुरक्षित ठिकाणी जमिनीत टाकून नष्ट करावेत, फवारणी करताना वाऱ्याची दिशा पाहावी, कीटकनाशक जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावे, कोट, हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी गॉगल या साहित्याचा वापर करावा, फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा न घेता नेमून दिलेल्या मापानुसार कीटकनाशक फवारावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.. ही सर्व आकडेवारी सराकरी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही हजारो शेतकरी उपचार घेत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जागरूकता मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. संबंधित बातम्या : कीटकनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी? चिनी बनावटीचे फवारणी पंप वापरल्याने शेतकऱ्यांना विषबाधा? फवारणी करताना विषबाधा, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत! ‘फवारणी करताना विदर्भात 18 जणांचा मृत्यू, तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर अकोल्यात 14 कोटींचा अवैध कीटकनाशक साठा जप्त

महत्त्वाच्या बातम्या

PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
Shivsena : शिवसेना वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखं उद्धव ठाकरे वागले, त्यांनी विचारधारा सोडल्यानेच पक्षात फूट; एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद
शिवसेना वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखं उद्धव ठाकरे वागले, त्यांनी विचारधारा सोडल्यानेच पक्षात फूट; एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
Vasai News: पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
Rahul Gandhi : पीएम मोदी UPI Tax मागं घ्या, इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींची मागणी, ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी शरणागती स्वीकारल्याचं टीकास्त्र
पीएम मोदी UPI Tax मागं घ्या,राहुल गांधींची इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत मागणी
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
Vasai News: पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात एमी फाऊंडेशनची हायकोर्टात याचिका, परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका, परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार
Sanjeev Sonawane Latur Crime: संजीव सोनवणेंच्या पत्रातील वाक्याने गूढ वाढवलं, पण पोलिसांना वेगळाच संशय, खात्री पटवण्यासाठी तज्ज्ञांची मदत
संजीव सोनवणेंच्या पत्रातील वाक्याने गूढ वाढवलं, पण पोलिसांना वेगळाच संशय, खात्री पटवण्यासाठी तज्ज्ञांची मदत
Embed widget