एक्स्प्लोर

रहेजा बिल्डरनं मराठी तरुणाला मारलं, 'घाटी' म्हणत हिणवलं, मनसेचा नेता म्हणाला, 'मुंबईत भाजपची सत्ता आल्यामुळे...'

Marathi Youth Assault Case: मुंबईतील बिल्डर सुशील रहेजा याच्यावर मराठी तरुणाला मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

Political Heat Rises As MNS Targets Builder: गेल्या काही महिन्यांपासून मराठी विरूद्ध अमराठी या वादामुळे मुंबईचं वातावरण चिघळलं होतं.  दरम्यान, पुन्हा एकदा मराठी विरूद्ध अमराठी असा वाद पेटण्याची शक्यता आहे. मुंबईतील प्रसिद्ध   बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या मराठी तरूणाला त्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे तर, शिवीगाळ करून मारहाणही करण्यात आली असल्याचं मराठी तरूणानं सांगितलं. या प्रकरणानंतर तरूणानं पोलीस ठाण्यात धाव घेत रहेजाविरोधात तक्रार दाखल केली.  आता या प्रकरणात मनसेनं उडी घेतली आहे. या प्रकरणाच्या संबंधित  मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.   ही पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

गजानन काळेंची पोस्ट व्हायरल

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा याच्यावर एका मराठी तरूणाने गंभीर आरोप केल्यानंतर खळबळ उडाली.  रहेजाने मराठी तरूणाला "तुम घाटी लोग कभी सुधरेगा नहीं", असं म्हणत तरूणाला जातिवाचक शिवीगाळ केली.  तसेच मारहाणही केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर मराठी लोकांनी रोष व्यक्त केला.  या प्रकरणात मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनीही पोस्ट शेअर करून संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, "गजानन काळे. मनसे प्रवक्ते... “तुम घाटी लोग सुधारोगे नही” म्हणत…मुंबईतील बिल्डर सुशील रहेजाकडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची … केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे…आता पाहूया आशिष शेलार, साटम आणि फडणवीसांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो …मीरा-भाईंदरला मेहता महापौर, तर मुंबईत रहेजा बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण… या घटना सूचक नाही तर धोक्याची घंटा आहेत …!!! बाकी, 
रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच…!!!", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या गजानन काळे यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक  सुशील रहेजा याच्या कार्यालयात एक मराठी तरूण कामाला आहे. तक्रारदार व्यक्ती रहेजा याच्या डॉ. सी जी गिडवाणी रोड,  रहेजा होम्स, तसेच चेंबूर येथील कार्यालयात  शिपाई म्हणून कार्यरत आहे.  घटनेच्या दिवशी मीटिंग होती आणि रहेजाने तक्रारदाराला कागदपत्रे जोडून स्टॅपल लावण्यास सांगितले.  दरम्यान, या कामात चूक झाल्याने, या क्षुल्लक कारणावरून रहेजाने मराठी तरूणाला झापले. तसेच "तुम घाटी लोग कभी सुधरेगा नहीं"  असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली.  

या घटनेनंतर तक्रारदार व्यक्तीने गोवंडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.  तसेच रहेजाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे रहेजाविरोधात कलम 115 बीएनएस 2023 सह  अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम) 1989 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Gunda Act: कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Dharmendra Pradhan Resign: मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा? सरसंघचालकांच्या 'त्या' भूमिकेने सरकार बॅकफूटवर; चर्चांना उधाण
मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा? सरसंघचालकांच्या 'त्या' भूमिकेने सरकार बॅकफूटवर; चर्चांना उधाण
Akola Crime News: भाड्याने राहणाऱ्या पोलिसाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवलं; नको ते केलं अन्..., अकोल्यातील तरुणीचा मृत्यू
भाड्याने राहणाऱ्या पोलिसाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवलं; नको ते केलं अन्..., अकोल्यातील तरुणीचा मृत्यू

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget