NASA : नासाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'मिशन अर्टिमिस'मध्ये भारतीय वंशाच्या सुभाषिनी अय्यर या महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. सुहासिनी अय्यर या मिशन आर्टिमिसमध्ये रॉकेटच्या कोअर स्टेजचे कामकाज पाहत असून त्या या मिशनच्या बॅकबोन असल्याचं सांगण्यात येतंय. ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट असून त्यामुळे अंतराळ क्षेत्राच्या विकासामध्ये भारतीयांनी आपला दबदबा कायम ठेवला असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


भारतीय वंशाच्या सुभाषिनी अय्यर या अर्टिमिस-1 च्या लॉन्च इंटिग्रेटेड प्रोडक्ट टीमचे नेतृत्व करत आहेत. त्यामध्ये या मिशनसाठी लागणाऱ्या विविध घटकांची निर्मिती केली जात आहे. 


मूळच्या भारतीय असलेल्या सुभाषिनी अय्यर यांचा जन्म कोईम्बतूरमध्ये झाला. त्यानी 1992 साली व्हीएलबी जानकीमल महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनियरची पदवी घेतली. अशी पदवी घेतलेल्या त्या महाविद्यालयाच्या पहिल्याच महिला होत्या. त्या गेली दोन वर्षे नासाच्या मून मिशन स्पेसच्या लॉन्च सिस्टिम म्हणजे एसएलसी प्रोजेक्टवर काम करत आहेत. 


आर्टिमिस-1 च्या माध्यमातून ओरियन स्पेसक्राफ्ट हे यान चंद्रावर जाणार आहे. ओरियन पृथ्वीपासून जवळपास साडे चार लाख किलोमीटरचा प्रवास करणार असून तो चंद्राच्या कक्षेच्या पलिकडचा असेल. नासाचे हे मिशन तीन आठवड्यांचं असेल. ओरियन यान हे चंद्रावर आणि त्याच्या कक्षेबाहेरही प्रवास करेल आणि त्या ठिकाणची विविध माहिती पृथ्वीवर पाठवेल. नासाचे हे ओरियन यान 2024 साली चंद्रावर उतरवण्यात येणार आहे. नासाच्या या मिशनच्या माध्यमातून एक महिला आणि एक पुरुषाला चंद्रावर पाठवण्यात येणार आहे.


महत्वाच्या बातम्या :