Zomato : ऑनलाईन नोंदणीवरून अन्नपदार्थ पोहोचवणाऱ्या झोमॅटोनं आता दहा मिनिटांमध्ये डिलिव्हरी करण्याची घोषणा केली आहे. अगोदर 30 मिनिटांमध्ये डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटोनं आता फक्त दहा मिनिटांमध्ये अन्नपदार्थ घरपोच देण्याचा वायदा केला असला तरी या निर्णयावर आक्षेपही घेतला जातोय. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 


 






रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं ही गरीब कुटुंबातील विद्यार्थी असतात.10 मिनिटांमध्ये फूड डिलिव्हरी देण्याची झोमॅटोची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीनं डिलिव्हरी बॉयच्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं आणि त्यांना विमा कव्हर देणं हे महत्वाचं आहे."


असं असेल नवं फिचर ?


अनेक लोक ऑनलाइन पद्धतीनं फूड ऑर्डर करतात. झोमॅटो या अॅपचा वापर करून लोक वेगवगेळ्या डिश ऑनलाइन पद्धतीनं ऑर्डर करतात. गेल्या वर्षी  ग्रोसरी डिलीव्हरी सुविधा सुरू केल्यानंतर आता झोमॅटो लवकरच दहा मिनीटांमध्ये फूड डिलेव्हरी देणार आहे. या नव्या फिचरला  झोमॅटो इंन्स्टंट (Zomato Instant) असं नाव देण्यात आलं आहे. कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल (Deepinder Goyal) यांनी या नव्या फिचरबद्दल माहिती दिली आहे. नव्या फिचरबद्दल दीपिंदर गोयल यांनी सांगितलं की, दहा मिनीटांमध्ये डिलीव्हरी करणाऱ्या या सिस्टीम काऊंटरच्या नेटवर्कचे काम सुरू आहे. हे काऊंटर जिथे जास्त प्रमाणात फूड ऑर्डर केले जाते, अशा परिसरात असेल, ज्यामुळे ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना गरम आणि ताजे अन्न मिळेल. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha