Zomato Swiggy App Down: ऑनलाईन फूड डिलेव्हरी करणाऱ्या स्विगी आणि झोमॅटो या कंपन्याची अॅप डाऊन झाले आहेत. यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक युजर्सनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अनेकांनी स्विगी आणि झोमॅटोवर निशाणा साधला आहे.
फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्याचे अॅप आणि संकतेस्थळ अनेकांची वेळेवर भूक भागवण्याचे काम करतात. कोणत्याही ठिकाणी जेवण पोहचवतात. त्यामुळे लाखो लोक या अॅपवर अवलंबून असतात. पण काही वेळापासून झोमॅटो आणि स्विगी या दोन कंपन्याचे अॅप डाऊन आहेत. त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे.
ट्विटरवर अनेक युजर्सनी स्विगी आणि झोमॅटो बंद झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अॅप सुरु केल्यानंतर "सध्या आम्ही ऑर्डर स्वीकारत नाहीये. काही वेळानंतर पुन्हा सुरु होईल." असा मेसेज दिसतोय. नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी मिम्सही पोस्ट केले आहेत.
बऱ्याच कालावधीपासून अॅप बंद आहेत. मात्र अद्याप कंपनीकडून कुठलंही स्पष्टीकरण अथवा कारण देण्यात आलेले नाही.