एक्स्प्लोर
फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या
फेसबुक पोस्टवरील वादातून सचिन कलुबर्मे या तरुणाची हत्या करण्यात आली होती.

पंढरपूर : सोलापुरातील मंगळवेढ्यात झालेल्या सचिन कलुबर्मेच्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेला युवक काँग्रेसचा माजी तालुका अध्यक्ष बाबासाहेब नाईकवडी याला पोलिसांनी अटक केली आहे. फेसबुक पोस्टवरील वादातून सचिनची काल हत्या झाली होती.
'कोणाला मंगळवेढ्याचं सरकार म्हणायचं?' या आशयाची पोस्ट फेसबुकवर करण्यात आली होती. त्यावरील कमेंट्समध्ये झडलेल्या वादातून सचिन कलुबर्मे या तरुणाचा जीव घेण्यात आला.
मुख्य सूत्रधार बाबासाहेब नाईकवडी याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. प्रशांत यादव आणि पांडुरंग नाईकवाडी या दोन नगरसेवकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून ते फरार आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
बातम्या
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
























