एक्स्प्लोर
Advertisement
चार्जिंगवेळी मोबाईल बॅटरीचा स्फोट, तरुणाची बोटं रक्तबंबाळ
सोमेश्वर हा खेकडा चार्जरने (extra battery charger) मोबाईल बॅटरी चार्ज करत होता.
परभणी: मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन तरुणाच्या हाताची तीन बोटे तुटली. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानोली इथं ही धक्कादायक घटना घडली.
सोमेश्वर तळेकर असं या 17 वर्षीय युवकाचं नाव आहे.
सोमेश्वर हा खेकडा चार्जरने (extra battery charger) मोबाईल बॅटरी चार्ज करत होता. मात्र त्यावेळी अचानक बॅटरीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की सोमेश्वरच्या हाताची तीन बोटे तुटली. इतकंच नाही तर त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान सोमेश्वरला मानवत येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याच्या बोटांची शस्त्रक्रिया केली आहे, त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहे.
मोबाईल फोन वापरताना कोणती काळजी घ्यावी?
चार्जिंग सुरु असताना कधीही मोबाईल फोनवर बोलू नये.
मोबाईल फोन रात्रभर चार्जिंगला लावू नये.
फोन चार्जिंग करताना तो लाकूड किंवा काचेच्या टेबलवर ठेवावा. पलंग किंवा उशीवर ठेवू नये.
संबंधित बातम्या
चार्जिंग करताना फोन उचलल्याने शॉक, मुंबईत तरुणाचा मृत्यू
मोबाईल चार्जिंग लावताना शॉक लागून मृत्यू
लॅपटॉप चार्जरनं घेतला युवकाचा बळी!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement