एक्स्प्लोर
परभणीतून आणखी एक आयसिस संशयित ताब्यात

परभणी : परभणी जिल्ह्यातून आणखी एका आयसिस संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. इस्लामिक दहशतवादी संघटना आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन 24 वर्षीय शेख इकबाल शेख कबीर अहमद या तरुणाला एटीएसने ताब्यात घेतले आहे. परभणी शहरातील मदिना नगर भागात एटीएसने ही कारवाई केली. याआधीही आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन परभणीतून दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं. शाहीद खान आणि नासिरबेन असं याआधी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत. या दोघांच्या चौकशीनंतर परभणीत एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शाहीद, नासिरबेन आणि शेख इकबाल शेख कबीर अहमद हे तिघेही मित्र आहेत. शेख इकबाल शेख कबीर अहमदवरील कारवाईला एटीएसनेही दुजोरा दिला आहे
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















