एक्स्प्लोर

बेळगावात येळ्ळूर साहित्य संमेलनाची उत्साहात सांगता

बेळगाव : बेळगावात 12 वं येळ्ळूर साहित्य संमेलन उत्साहात पार पडलं. डॉ. श्रीपाद जोशी हे संमेलनाचे अध्यक्ष होते, तर हैदराबादमधील सायराबाद पूर्वचे पोलिस आयुक्त महेश भागवत यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घटन झालं. "देशातील प्रत्येक व्यक्तीला मत व्यक्त करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्यामुळे देशात, राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असो मत व्यक्त करणाऱ्याचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. सीमाभागात सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणि मराठी भाषा ,संस्कृती जतन करण्यासाठी भरवली जाणारी साहित्य संमेलने प्रशंसनीय आहेत . सीमावासीयांचा लढा सीमाप्रश्न सुटेपर्यंत असाच सुरु राहूदे . महाराष्ट्र सरकारने सीमावासियांच्या लढ्याची दखल घेतली पाहिजे." असे उदगार डॉ . श्रीपाद जोशी यांनी येळ्ळूर येथील बाराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना काढले . बेळगावात येळ्ळूर साहित्य संमेलनाची उत्साहात सांगता मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलन पाच सत्रात पार पडले . महापौर सरिता पाटील, उप महापौर संजय शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संमेलनाला उपस्थिती दर्शवली होती . कोणते ठराव संमत झाले? सीमाप्रश्नाची सोडवणूक लवकरात लवकर व्हावी, सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सीमाप्रश्नाच्या दाव्याच्या कामकाजात कोणतीही उणीव राहणार नाही याची महाराष्ट्र सरकारने काळजी घ्यावी आणि वकिलांना पाठबळ द्यावे असा ठराव येळ्ळूर येथील बाराव्या साहित्य संमेलनात एकमताने टाळ्यांच्या गजरात संमत करण्यात आला. सीमाप्रश्नाच्या ठरावा बरोबरच मराठा मोर्चा, सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार द्यावीत, सीमाभागात मराठी भाषांनी संस्कृतीचे जतन करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांना महाराष्ट्र सरकारने दरवर्षी निधी द्यावा, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा शोध लावावा असे ठराव संमेलनात संमत करण्यात आले. बेळगावात येळ्ळूर साहित्य संमेलनाची उत्साहात सांगता गावातून निघालेली ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. मुलींचे लेझीम पथक,झाँज पथक, मार्गावर केली जाणारी पुष्पवृष्टी, विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी दिंडीच्या मार्गावरील साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. उद्घाटनाच्या सत्रानंतर दुसऱ्या सत्रात साहित्यिक वसंत लिमये यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. तिसऱ्या सत्रात विविध स्पर्धेतील विजेत्यांचा तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. चौथ्या सत्रात आयोजित कवी संमेलनात कवींनी एकाहून एक सरस कविता सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. शेवटच्या सत्रात अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीतून त्यांनी आपला अभिनय प्रवास उलगडला. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. त्याचा लाभ ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेतला

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget