एक्स्प्लोर
यवतमाळ लैंगिक छळ : किशोर दर्डांच्या अटकेची मागणी

यवतमाळ : जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या लैंगिक छळाप्रकरणी नागरिकांनी आजही आक्रमक रुप धारण केलंय. शनिवारी दोन शिक्षकांना अटक झाल्यानंतर पालक आता संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांच्या अटकेची मागणी करत आहेत. दर्डानगरमध्ये संतप्त जमावानं आज काँग्रेस नेते विजय दर्डा यांच्या विकासकामांच्या फलकांची तोडफोड केली. रस्त्यावर टायरही पेटवून देण्यात आले. त्यानंतर या भागात पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय. विजय दर्डा अध्यक्ष असलेल्या जवारलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये दोन शिक्षकांनी शाळकरी विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. संतप्त महिला पालकांनी काल किशोर दर्डा यांच्या घरासमोर बांगड्या फोडल्या. किशोर दर्डा हे पब्लिक स्कुलचे सचिव आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत कारवाईचं आश्वासन दिलेलं असलं तरी संस्था आरोपी शिक्षकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
Before You Go
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















