एक्स्प्लोर

विषारी फवारणीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री यवतमाळला

कीटकनाशकांमुळे 700 हून जास्त गावकऱ्यांना विषबाधा झाली होती, तर एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 22 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

यवतमाळ : बंदी असलेली कीटकनाशकं कुणाकडे सापडत असतील, तर अशी व्यक्ती आणि कंपन्यांवर कलम 307 आणि संघटित गुन्हेगारीसारखे गुन्हे दाखल करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीच्या त्रासामुळे जवळपास 22 शेतकऱ्यांनी जीव गमावल्यानंतर मुख्यमंत्री यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी देवेंद्र फडणवीसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. इतक्या घटना घडल्यानंतरही जर कुणी कीटकनाशकं बाळगत असेल, तर त्याच्यावर सक्त कारवाई करावी, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं. कीटकनाशकांमुळे 700 हून जास्त गावकऱ्यांना विषबाधा झाली होती, तर एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 22 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. अद्यापही बऱ्याच रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. शेतकरी आत्महत्या प्रकरणी बीड जिल्ह्यातल्या दहा पोलिस ठाण्यात ही फिर्याद दाखल करण्यात आली आहे. कर्जमाफीच्या बाबतीत फडणवीस सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'
Ashadhi Wari : गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget