एक्स्प्लोर

तिसऱ्या मजल्यावरुन लहानगा मित्राच्या अंगावर पडला आणि...

पतंग काढण्याच्या नादात स्वप्नीलचा तोल गेला आणि तो पतंगासह सर्व्हिस लाईनच्या वीजेच्या तारेवर पडला. त्याच्या झटक्यासरशी वीजेची तार तुटली आणि स्वप्नील खाली कोसळला.

यवतमाळ : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय यवतमाळमधल्या लहानग्यांच्या बाबतीत आला. पतंग काढताना तिसऱ्या मजल्यावरुन पडलेला मुलगा मित्राच्या अंगावर पडला. सुदैवाने यात दोघांनाही साधं खरचटलंसुद्धा नाही. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील चौबारा चौकात ही आश्चर्यकारक घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाली आहे. स्वप्नील झगरे हा 11 वर्षांचा मुलगा पुसदच्या कोषटवार शाळेत पाचवीत शिकतो. दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त स्वप्नील  मित्रांसोबत चौबारा परिसरातील अतुल रेवणवार यांच्या घरासमोर खेळत होता. त्याला इमारतीच्या उंच टोकावर पतंग अडकलेला दिसला. पतंग काढण्यासाठी स्वप्नील छतावर चढला आणि त्याचा मित्र अमोघ तगलपल्लेवार खाली थांबला. पतंग काढण्याच्या नादात स्वप्नीलचा तोल गेला आणि तो पतंगासह सर्व्हिस लाईनच्या वीजेच्या तारेवर पडला. त्याच्या झटक्यासरशी वीजेची तार तुटली आणि स्वप्नील खाली कोसळला. काही क्षणांसाठी स्वप्नीलच्याही जीवाचा थरकाप उडाला. मात्र नेमका त्याचवेळी पतंग पकडण्यासाठी खाली धावलेला त्याचा मित्र देवदूत ठरला. स्वप्नील मित्राच्याच पाठीवर अलगद पडल्याने दोघांनाही साधं खरचटलंही नाही. पुढच्या क्षणी उठून बसत स्वप्नील मित्रांसह पतंग घेऊन निघून गेला. भांगडे चिल्ड्रन हॉस्पिटलमधून नर्सची ड्यूटी आटपून स्वप्नीलची आई स्वाती झगरे घरी आली, तेव्हा स्वप्नीलच्या मित्रांनी ही घटना सांगितली. तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना. आईने स्वप्नीलला पटकन कुशीत कवटाळले. पाहा व्हिडिओ :

महत्त्वाच्या बातम्या

Thackeray Brothers Rally : राज-उद्धव स्टेजवर, शिवाजी पार्ककडे येणारे सगळे रस्ते गर्दीने भरले अन् ए. आर. रेहमानचं गाणं लागताच सगळं वातावरण देशभक्तीने भारुन गेलं
राज-उद्धव स्टेजवर, शिवाजी पार्ककडे येणारे सगळे रस्ते गर्दीने भरले अन् ए. आर. रेहमानचं गाणं लागताच सगळं वातावरण देशभक्तीने भारुन गेलं
Maharashtra Live blog updates: मुंबईतील शिवाजी पार्क गर्दीने तुडुंब भरुन गेलं, ठाकरे बंधू तिरंगा मार्चसाठी बाहेर पडले, 'जेन झी'ची तुफान गर्दी
Maharashtra Live blog updates: मुंबईतील शिवाजी पार्क गर्दीने तुडुंब भरुन गेलं, ठाकरे बंधू तिरंगा मार्चसाठी बाहेर पडले, 'जेन झी'ची तुफान गर्दी
Tukaram Mundhe: ठाकरे आणि 'जेन झी'च्या मोर्चात तुकाराम मुंढेंची हवा, त्या बॅनरची चर्चा, धडाकेबाज कारवाईमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले
ठाकरे आणि 'जेन झी'च्या मोर्चात तुकाराम मुंढेंची हवा, त्या बॅनरची चर्चा, धडाकेबाज कारवाईमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना मोदींना बदनाम करून पदावरून हटवायचंय, त्यांना स्वतः पंतप्रधान व्हायचंय'; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
'अमित शाहांना मोदींना बदनाम करून पदावरून हटवायचंय, त्यांना स्वतः पंतप्रधान व्हायचंय'; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thackeray Brothers Rally : राज-उद्धव स्टेजवर, शिवाजी पार्ककडे येणारे सगळे रस्ते गर्दीने भरले अन् ए. आर. रेहमानचं गाणं लागताच सगळं वातावरण देशभक्तीने भारुन गेलं
राज-उद्धव स्टेजवर, शिवाजी पार्ककडे येणारे सगळे रस्ते गर्दीने भरले अन् ए. आर. रेहमानचं गाणं लागताच सगळं वातावरण देशभक्तीने भारुन गेलं
Maharashtra Live blog updates: मुंबईतील शिवाजी पार्क गर्दीने तुडुंब भरुन गेलं, ठाकरे बंधू तिरंगा मार्चसाठी बाहेर पडले, 'जेन झी'ची तुफान गर्दी
Maharashtra Live blog updates: मुंबईतील शिवाजी पार्क गर्दीने तुडुंब भरुन गेलं, ठाकरे बंधू तिरंगा मार्चसाठी बाहेर पडले, 'जेन झी'ची तुफान गर्दी
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
Embed widget