Yavatmal Washim Lok Sabha : देशभरात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) काल सांगता झाली आहे. आता साऱ्यांना वेध लागले आहे ते 4 जून रोजी लागणाऱ्या निकालाचे. यवतमाळ-वाशिम लोकसभेचा निकाल देखील येत्या 4 जून रोजी लागणार आहे. या निकालाची उत्सुकता आता उमेदवारांसह कार्यकर्त्यांना देखील लागली आहे. परंतु पुसद शहरामध्ये निकालापूर्वीच यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे (Yavatmal Washim Lok Sabha) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख (Sanjau Deshmukh) हेच निवडून येतील, असे बॅनर झळकले आहे.


पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे बॅनर झळकले आहे. या बॅनरवर "विजय निश्चित” अरे कोण म्हणतो येत नाही, आल्याशिवाय राहत नाही, असा आशययुक्त हे बॅनर आहे. या बॅनरवर उमेदवार तथा माजी मंत्री संजय देशमुख यांचा फोटो देखील आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा देखील फोटो आहे. मात्र,या बॅनरची एकच चर्चा आता संपूर्ण मतदारसंघात होत असून किती हा आत्मविश्वास, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. हे बॅनर संजय देशमुख यांचे समर्थक आणि कार्यकर्ते राजू दुधे मित्र मंडळ यांच्याकडून लावण्यात आले आहे.


विजयाची शंभर टक्के खात्री- संजय देशमुख


अठराव्या लोकसभा निवडणुकांची शनिवारी सांगता झाली आहे. देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळी काल संपल्यावर साऱ्यांची उत्सुकता असलेल्या एक्झिट पोलचे (Result 2024 Exit Poll) आकडे समोर आले आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष असल्याचं एबीपी सी वोटरच्या एक्झिट (ABP-CVoter) पोलमध्ये समोर आले आहे. तर एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीला यांच्यात अटीतटीची लढाई असल्याचं दिसत आहे.


तर यावरून आता अनेक दावे-प्रतिदावे केले जात असतानाच महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहे. सध्या या विजयी बॅनरची चर्चा रंगत असताना दुसरीकडे आपल्या विजयाची शंभर टक्के खात्रीही संजय देशमुख यांनी बोलताना व्यक्त केली आहे.


शेतकर्‍यांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारवर तीव्र नाराजी 


यवतमाळ-वाशिम  या भागातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, तरुण बेरोजगारांच्या हाताला काम नाही. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असून सुद्धा केंद्र सरकारने या जिल्ह्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे यवतमाळ वाशिम या भागातील शेतकर्‍यांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारवर तीव्र नाराजी आहे. सरकारने कष्टकरी, कामकरी, कामगार,शेतकरी, तरुण वर्गाच्या कुठल्याही अपेक्षा अथवा काम पूर्ण केलेले नाही.


परिणामी, याचाच फायदा मला होणार आहे. महाविकास आघाडी मधील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केलं. त्यांच्या मेहनतीचा आणि परिश्रमाचे फळ मला या ठिकाणी मिळणार असून माझ्या विजयाची शंभर टक्के खात्री मला असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी बोलून दाखवला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या