Nana Patole on Sanjay Raut : अठराव्या लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) अखेर सांगता झाली आहे. देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळी काल संपल्यावर साऱ्यांची उत्सुकता असलेल्या एक्झिट पोलचे (Result 2024 Exit Poll) आकडे समोर आले आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष असल्याचं एबीपी सी वोटरच्या एक्झिट (ABP Cvoter Exit Poll) पोलमध्ये समोर आले आहे. एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीला यांच्यात अटीतटीची लढाई असल्याचं दिसत आहे. तर यावरून आता अनेक दावे-प्रतिदावे केले जात असतानाच महाविकास आघाडी मध्ये सांगलीच्या जागेवरून परत एकदा खडाजंगी रंगल्याचे पाहायला मिळाले आहे.
संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केलीय
सांगलीच्या जागेवरून बोलताना संजय राऊत यांनी आम्ही गोट्या खेळायला आलेलो नसल्याचे म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. राजकारणात कुणीही गोट्या खेळायला बसले नाही. मात्र तुम्ही 100 टक्के राजकारण करत असाल, तर आम्ही 20 टक्के राजकारण आणि 80 समाजकारण करतो. संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केलीय.
तसेच संजय राऊत यांचा जन्म झाला ते रुग्णालय देखील काँग्रेसने निर्मांन केलंय, त्यांच्या गावात वीज-पाणी दवाखाने काँग्रेसच्या काळात पोहचले. संजय राऊत कालच लंडनहून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तिथल्या थंडीचा परिणाम आहे की इथल्या उन्हाचा, हे बघितले पाहिजे. मी त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही. अशा शब्दात प्रतिक्रिया देत नाना पटोले (Nana Patole) यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांना धमकावलं
एक्झिट पोलच्या (Result 2024 Exit Poll) अंदाजावर भाष्य करताना पुढे नाना पटोले म्हणाले की, जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. तर पंतप्रधान मोदींचा करिश्मा आता पुरता उतरलेला आहे. आम्ही सुरवातीपासून सांगतोय की ही निवडणूक मोदी सरकार विरोधात जनता अशी राहिली आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि राहुल गांधी यांच्या यात्रेच्या माध्यमातून पोषक वातावरण तयार झाले आणि जनता विरुद्ध सरकार अशी ही निवडणूक झाली.
एक्झिट पोल आले आहेत ते गोदी मीडियाचे आहेत. त्यामुळे आमचे मत हे 4 तारखेला बघू. आमच्या सगळ्या उमेदवारांना आम्ही सांगितले आहे की शेवटचे मत मोजल्याशिवाय मतमोजणी केंद्रातून बाहेर पडायचे नाही. निवडणुकीत अटीतटीची लढाई होइल. केंद्रीय गृहमंत्रालयाने 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले आहे. भाजप घाबरले आहे हे यातून स्पष्ट होत असल्याचेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या