Yavatmal News Update : अमरावतीवरून (Amravati) यवतमाळला येणाऱ्या एसटी ( क्रमांक, एमएच 06 एस 8826) आणि टीयगो कार ( क्रमांक, एमएच 29 बीसी 9173) यांची समोरासमोर  धडक झाली. या अपघातात (Accident) चार जणांचा मृत्यू झालाय. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर यवतमाळच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. राधेश्याम इंगोले (रा. यवतमाळ ), रजनी इंगोले (रा. यवतमाळ ), वैष्णवी गावंडे ( रा. वाशिम )  आणि सारीका चौधरी ( रा. पुसद यवतमाळ ) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर साक्षी प्रमोद चौधरी ( रा. पुसद ), प्रमोद पांडुरंग चौधरी, सारीका संतोष गावंडे आणि संतोष गावडे अशी जखमींची नावे आहेत.  


 रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. लग्न सोहळ्यावरून परत येत असताना काळाने घाला घातलाय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गावंडे, चौधरी आणि इंगोले कुटुंबीयांच्या नातेवाईकांचे 3 डिसेंबर रोजी अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर येथे लग्न होते. या लग्नसोहळा अटोपून आज सकाळी यवतमाळकडे परत येत होते. यावेळी विरुद्ध दिशेने जात असलेल्या एसटी बसने कारला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये वाहनातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले आहे. 


अमरावती-यवतमाळ मार्गावरील (Amravati Yavatmal Road) नेर जवळील लोणी गावाजवळ हा भीषण अपघात झालाय. हा अपघात एवढा भीषण होता की टीयागो कार मधील तीन जण जागीच ठार झाले. तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमींना उपचारासाठी नेर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अपघाताची अधिक चौकशी करत आहेत. 


महत्वाच्या बातम्या


Kolhapur Crime : पोलिसांच्या गाडीखाली चिरडून शाळकरी मुलाचा अंत; कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात 4 मृत्यूमुखी 


Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची 'टेस्ट राईड'; फडणवीसांच्या हाती 'स्टेअरिंग'