Yavatmal News: यवतमाळच्या (Yavatmal) वणी तालुक्यातील सुकनेगाव शिवारात असलेल्या तलावाजवळ एक वाघाचे (Tiger) पिल्लू मृतावस्थेत आढळले आहे. वाघाच्या या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या भागातील मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आणि जंगल परीसर आहे. गेल्या काही काळापासून या परिसरात वाघाचा वावर देखील वाढला असल्याचे बोलले जात आहे. याच भागत यापूर्वी वाघाने जनावर तसेच शेतमजुरावर हल्ला चढवल्याच्या घटना देखील घडल्या आहे. दरम्यान, काही दिवसांपासून एका वाघिणीचा वावर या परिसरात नागरिकांना आढळून आला आहे. घटनेतील मृत वाघाचे (Tiger Death) पिल्लू त्याच वाघिणीचे असल्याचे बोलले जात आहे.
आईपासून विभक्त झाल्याने भूकबळीमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज
वणी तालुक्यातील सुकनेगाव येथील तलावाजवळ काही नागरिक कामानिमित्य गेले असता त्यांना एक मृत वाघाचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर त्यांनी याबात तत्काळ माहिती वन विभागली दिली. माहिती मिळताच वन परीक्षेत्रीय अधिकारी प्रभाकर सोनडवले यांनी पथकासह तातडीने घटनास्थळ गाठले. प्रथमिक अंदाजावरून हे मृत वाघाचे पिल्लू तीन महिन्याचे असल्याचे बोलले जात आहे.
सुकनेगाव परीसरात मागील काही दिवसांपासुन एका वाघिणीचा संचार असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत वाघाचे पिल्लू हे देखील त्याच वाघिणीचे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाघिनीपासून पिल्लू विभक्त झाले आणि त्याचा भूकबळीमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज देखील वन विभागाने वर्तविला आहे. वन अधिकाऱ्यांनी या वाघाच्या घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मंदर येथील निलगीरी वनात मृत पिलावर अत्यंसंस्कार केले.
माया ऑगस्टपासून गायब
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील माया ही वाघीण जगप्रसिद्ध असून तिचे जगभरात लाखो चाहते आहेत. Queen of tadoba असलेल्या माया चे social sites वर लाखो फोटो आणि व्हिडीओ आहेत. 2010 मध्ये लीला आणि हिलटॉप या जोडीपासून माया चा जन्म झाला होता. मात्र माया ही वाघीण ही गेल्या ऑगस्ट 2023 पासून गायब आहे. माया वाघिणीचा माग काढण्यासाठी वणविभागाने अनेक प्रयत्न केले आता अद्याप त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. माया वाघीण शेवटची 25 ऑगस्टला पंचधारा या लोकेशनवर मजुरांना दिसली होती. त्यावेळी ती प्रेग्नंट असल्याचं वाटत होतं, त्यामुळे तिच्या जवळ छोटे बच्चे असल्याने ती बाहेर येत नसावी अशी एक शक्यता वर्तवण्यात आली होती. मायाच्या टेरेटरी मध्ये छोटी तारा आणि रोमा या दोन वाघिणी पण दिसत होत्या. त्यामुळे मायाने आपला परिसर बदल्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली होती.
माया सध्या 13 वर्षांची आहे आणि या वयात वाघाचा नैसर्गिक मृत्यू होणे स्वाभाविक असल्याने वनविभाग यादृष्टीने पण शक्यता तपासत आहे. माया या वाघिणीची टी-12 नावाने वनविभागाच्या दफ्तरीत नोंद आहे. अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण अशी ओळख 'माया'ची आहे. पर्यटकांना ती कधी एकटी कधी इतर वाघांसह तर कधी पिल्लांबरोबर दिसून येते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांना बघण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येत असतात. मात्र त्यात मायचा सर्वाधिक चाहता वर्ग असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाची बातमी
Chandrapur News : वाघाच्या हल्ल्यात वनमजूर दगावला; ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील घटना