रायगड : 'भगवा एकच... आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या शिवसेनेचा,  दुसऱ्या शिवसेनेचा भगवा आम्हाला मान्य नाही आणि भाजपचं फडकं तर अजिबात नाही. माझा पक्ष चोरायची तुमची लायकी नाही', असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) थेट वार केलाय. महाराष्ट्र हा लेचापेचा देश नाही, लाचार भेकड, मिंदे हे भाजपासोबत गेले आहेत. हे कधी नेते चोरतात,कधी महापुरुष चोरतात. नितीशुन्य, विचारशून्य पक्ष देशावर 10 वर्ष राज्य करतोय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर देखील निशाणा साधला. आता लोकसभा (Loksabha Election 2024) कळसाला भगवा फडकवायचा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांचं देखील रणशिंगं फुंकलं असल्याचं पाहायला मिळालं. 


पदाला साजेसा निर्णय देण्याची त्यांना संधी होती. पण लाचारीमुळे, दलालीमुळे समोर येणार कागद वाचावा लागतो. लोकशाहीचा कायद्याचा मुडदा पाडताना सर्व जग तुमच्याकडे पाहतंय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय. तसेच या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिंदे गट आणि केंद्र सरकारच्या अंतरिम बजेटवर देखील भाष्य केलं. 


बजेट मांडणारं सरकार पुढच्या वेळी नसेल, उद्धव ठाकरेंचा निशाणा


बजेट मांडणारं सरकार हे पुढच्या वेळी नसेल. हे सरकार पुढे येणार नही. 10 वर्ष सत्ता भोगल्यानंतर त्यांना साक्षात्कार झालाय. महिला , शेतकरी , गरीब , तरुण या चार जाती सरकारला दिसत आहेत. दुसरीकडे राज्यात जातीचे सर्वेक्षण सुरू आहे. दुर्वैवाने यांचे सरकार आलं की कमी केलेले गॅस, पट्रोल परत वाढणार, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अंतरिम बजेवट भाष्य केलंय. 


तेव्हा केंद्राचा एकही पैसा नव्हता - उद्धव ठाकरे


जेव्हा निसर्ग वादाळामुळे जे नुकसान झालं त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा मी मदत केली. केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन मी मदत केली होती. केंद्राने एकही पैसा दिला नव्हता. आता पंतप्रधान मोदी तुमच्या झोपडीत येऊन राहतील, आश्वासन देतील, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. 


नितेश कुमार यांना फोडले. आता बिहारला 5 लाख कोटीचे पॅकेज द्या, आम्हाला अडचण नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 10 वर्ष लागली राम मंदिर बांधायला. कोर्टाच्या आदेशाने मंदिर तयार झाले. आमची शिवसेनाही त्या आंदोलनात होती. मी राम मंदिराचा आनंद नाशिकमध्ये साजरा केला. या देशासाठी जो मरायला तयार आहे, तो माझा. मुस्लिम असला तरीही चालेल. राम आमच्या हृदयात आहे, हाताला काम देणारा राम पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. 


ही बातमी वाचा : 


Uddhav Thackeray : "तुम्ही देव मानत असाल, तर माना, पण मोदींची तुलना छत्रपतींशी करणारे बिनडोक"; उद्धव ठाकरेंचा गोविंदगिरी महाराजांवर हल्लाबोल