Yavatmal News: आर्णी येथून प्रसूतीसाठी महिलेला घेऊन यवतमाळकडे येत असलेल्या रुग्णवाहिकेने अचानक पेट(Fire) घेतल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आर्णी मार्गावरील गुरुद्वारा परिसरात सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान राखत स्वतः सह रुग्णवाहिकेत असलेल्या गर्भवती महिलेसह इतर दोघांनाही तातडीने बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला असून यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या भीषण आगीच्या लोटात काही मिनिटातच रुग्णवाहिका अक्षरशः जाळून खक झालीय.
दिवसाढवळ्या द बर्निंग रुग्णवाहिके थरार!
भरदुपारी मुख्य रस्त्यावर लागलेल्या या आगीनंतर तात्काळ या बाबतची माहिती अग्निशमन दलाल देण्यात आली आणि त्यानंतर अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमन बंब घटनास्थळी येईपर्यंत रुग्णवाहिका अर्ध्याहून जळून खाक झाली होती. रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडर ठेवलेले होते. त्यामुळे संभाव्य स्फोटाची भीती व्यक्त होत होती. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
विदर्भात उन्हाचा पारा चाळीशी पार
गेल्या काही दिवसांपासून राज्यसह विदर्भात उन्हाचा पारा आग ओकतो आहे. आजघडीला विदर्भातील बहुतांश भागात उषणतेच्या पाऱ्याने केव्हाच 40 अंश सेल्सिअसच्या आकडा गाठला आहे. तर आज विदर्भात सर्वाधिक तापमान 42. 6 अंश सेल्सिअस हे चंद्रपुर जिल्ह्याचे नोंदविण्यात आले आहे. तर यवतमाळ मध्ये हेच तापमान 42. 2 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. आज यवतमाळ आणि चंद्रपुर मध्ये उषणतेची लाट आल्याची माहितीही हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाढत्या उन्हांच्या झळामुळे धावत्या गाड्या पेटण्याच्या घटना वाढल्या आहेत.
अशीच एक थरारक घटना शहरातील दिग्रस मार्गावर गुरुवारच्या दुपारी घडली. यात एक दुचाकीने अचानक पेट घेतला असून परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुचाकीने पेट घेतल्याचे लक्षात येताच जवळील पेट्रोल पंपावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यात पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या अग्निबंबामुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. मात्र या आगीत गाडीचे देखील नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उषणतेचे पाऱ्याने कहर केला असून वाढत्या उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात दुचाकी, चारचाकी वाहनचालकांनी वाहन चालविताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याचेही बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या