Yavatmal Crime News : अनैतिक संबंधातून एका प्राध्यापकाची हत्या (Murder of professor in Yavatmal) त्याच्याच वनरक्षक पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेडमध्ये (Umarkhed) एका प्राध्यापकाचा मृतदेह दिग्रस जवळच्या सिंगद येथे आढळून आला होता. यानंतर या घटनेबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात आले होते.  शेवटी मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहेत. त्यावरून आता पोलिसांनी तपास करून मृत प्राध्यापकाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. सचिन वसंत देशमुख असं हत्या झालेल्या प्राध्यापकाचं नाव आहे. तर धनश्री देशमुख आणि शिवम बचके अशी आरोपींची नावं आहेत. 


पोलिसांच्या माहितीनुसार मृतक सचिन वसंत देशमुख हा उमरखेड येथील कृषी महाविद्यालयत प्राध्यापक होता. तर त्याची पत्नी धनश्री ही अकोट इथे वनविभागात वनरक्षक नोकरीला आहे. त्यामुळे सचिन हा पत्नीला भेटण्यासाठी अकोटला गेला. मात्र 5 दिवसानंतर तो घरी परतला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान पोलिसांना दिग्रस जवळच्या सिंगद येथील पुलाखाली सचिन देशमुख याचा मृतदेह आढळून आला. 


या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. शवविच्छेदनानंतर सचिनचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या आधारे सचिनची पत्नी आणि तिचा प्रियकर यांनी हत्या केल्याचं प्राथमिक तपासणीत समोर आलं. यानंतरर दिग्रस पोलिसांनी मृतकाची पत्नी धनश्री आणि वन विभागातील कर्मचारी असलेला तिचा प्रियकर शिवम बचके या दोघांनाही अटक केली. त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अनैतिक संबंधातून धनश्रीने प्रियकराच्या मदतीने पती सचिनला संपविल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाने उमरखेड तालुका हादरून गेला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या