दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. टॅटूसाठी एकच सुई वापरल्यानं 14 जणांना एड्स, उत्तर प्रदेशच्या वाराणसीतील धक्कादायक घटना, सुई वापरताना सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन
2. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर, मंत्रिमंडळ विस्तारही आणखी रखडण्याची शक्यता, सर्वोच्च न्यायालयात 8 ऑगस्टऐवजी 12 ऑगस्टला सुनावणी
3. जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, धनखड यांना 528 मतं, तर मार्गारेट अल्वा यांनी 182 मतं
Vice President Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी संध्याकाळी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांची भेट घेतली आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. भाजप (BJP) अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनीही धनखड यांची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Vice President Election) धनखड यांना विजयी घोषित केल्यानंतर लगेचच या बैठका झाल्या. धनखड यांना 528 तर विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांना 182 मतं मिळाली.
4. महाराष्ट्रात 45 लोकसभा मतदारसंघासाठी भाजपची विशेष रणनीती, 16 ऑगस्टला अर्थमंत्री निर्मला सीतारमण पवारांच्या बारामती दौऱ्यावर, सेनेचं प्राबल्य असलेल्या 10 मतदारसंघांवरही लक्ष
5. अकोल्यात एकाच कॉलेजमधील 4 विद्यार्थी 6 दिवसांपासून बेपत्ता, एक तरुणी आणि 3 तरुणांचा समावेश, लवकरच शोध घेण्याचं अकोला पोलिसांसमोर आव्हान
6. मुंबईवर वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे धरणात 90 टक्के पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, मुंबईकरांना मोठा दिलासा
7. मराठवाड्यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
8. बर्गिंगहॅम राष्ट्रकुलमध्ये भारतीय कुस्तीपटूंची धाकड कामगिरी, पाकिस्तानच्या कुस्तीपटूला लोळवत 19 वर्षीय नवीनची सुवर्णपदकाला गवसणी, भारताची पदक संख्या चाळीसवर
9. वनडे पाठोपाठ वेस्ट इंडिज विरुद्धची टी-20 मालिकाही भारताच्या खिशात, चौथ्या वनडेत विंडीजचा 59 धावांनी धुव्वा, कर्णधार रोहित शर्माचा आठवा मालिका विजय
10. जगभरात आज फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन, मैत्रीचे धागे गुंफण्यासाठी तरुणाईचा उत्साह शिगेला, एबीपी माझावरही खास कार्यक्रम