Yavatmal Crime News यवतमाळ: राज्याच्या सीमेलगत असलेल्या गावातून छुप्या पद्धतीने प्रतिबंधित अमली पदार्थ आणि विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.  नवनवीन शक्कल लावून छुप्या पद्धतीने वाहतूक करणाऱ्या तस्करांविरोधात पोलिसांनी (Police) आपली कंबर कसली आहे. अशातच एका मोठ्या तस्करीला हाणून पाडण्यात पोलीस आणि अन्न व औषधी विभागाच्या कारवाईमध्ये मोठे यश आले आहे. कर्नाटकातून दिल्लीला जाणाऱ्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाची सुपारी सापडली आहे.


 यवतमाळच्या (Yavatmal Crime News) पांढरकवडा येथील टोल नाक्यावर एफडीएने सापळा लावत ही कारवाई केली आहे. ज्यामध्ये एका ट्रक मधून तब्बल 27 लाख रुपये किमतीची आणि 24 हजार 498 किलोची निकृष्ट दर्जाची सुपारी सापडून आली आहे. ही सुपारी प्रथमदर्शनी निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्याबाबतचा अधिकृत तपासणी अहवाल घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या सुपारीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठविण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतरच या सुपारीबाबत कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


 तब्बल 27 लाख रुपये किमतीची निकृष्ट दर्जाची सुपारी जप्त


कर्नाटक येथून एक ट्रक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरुन दिल्ली येथे जात असून त्यात निकृष्ट दर्जाची सुपारी असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए) मिळाली. या माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकाने केळापूर टोलनाक्यावर सापळा लावला. दरम्यान एक संशयित ट्रकची (आरजे 04 जीसी 4478) अडवणूक करून त्याची विचारणा केली असता, त्याने उडवा उडवीचे उत्तर दिली. त्यानंतर त्याच्या ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये निकृष्ट दर्जाची सुपारी आढळून आली. त्यानंतर त्याबाबत विचारणा केली असता त्याने सत्य सांगण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहिती नुसार ट्रकचालकाने सुपारी कर्नाटक येथून दिल्लीला नेत असल्याचे सांगितले.


या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये कारवाई केली जात आहे. सुपारीचा नमुना घेऊन उर्वरित 24 हजार 498 किलो सुपारी जप्त केली. या सुपारीची बाजारातील किंमत 27 लाख रुपये इतकी आहे. ही कारवाई मंत्री धर्मराव बाबा आत्राम, आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या आदेशन्वये सहआयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे, सहआयुक्त जयपूरकर, सहायक आयुक्त (दक्षता) आनंद महाजन, सहायक आयुक्त गोपाल माहोरे यांच्या मार्गर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे आणि संदीप सूर्यवंशी यांनी केली.


सुपारी मानवी आरोग्याला घातक


तेलंगणा सीमेवरून मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची तस्करी केली जाते. त्यामुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क राहून अशा तस्करांवर विशेष पाळत ठेऊन असते. ही सुपारी प्रथमदर्शनी निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून आले आहे. अशा सुपारीचा वापर मुख्यता पानमसाल्यामध्ये, गुटखा तयार करण्यासाठी केला जातो. देशभरात निकृष्ट सुपारीचा मोठा व्यापार आहे. शिवाय त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल देखील होत असते. ही सुपारी मानवी आरोग्याला घातक ठरणारी आहे. त्यामुळे एफडीएची यावर नजर असते. त्यातूनच ही मोठी कारवाई करण्यात अन्न व औषधी विभागाची मोठी कारवाईला यश आले आहे. 



  • इतर महत्वाच्या बातम्या 


Yavatmal News: किरकोळ पार्किंगचा वाद विकोपाला; एकाची निर्घृण हत्या, मारेकरी पती-पत्नीला अट