पुणे : पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक घटना (Pimpri-Chinchwad) समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरातील चालू बांधकामाची इमारत (Building) एका बाजूला अचानकपणे (Wakad Area) झुकली आहे. ही इमारत पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे त्यामुळं रात्रीपासून अग्निशमन दल (Fire Brigade) आणि पोलीस प्रशासन (PCMC Police) या इमारतीजवळ दाखल झालं आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी भीती पसरली आहे. साधारण ही इमारत अचानकपण पडून कोणतीही जीवितहानी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. 



माहितीनुसार, सध्या इमारतीला खालून सपोर्ट देण्यात आला आहे. मात्र ही इमारत जमीनदोस्त करावी लागण्याची दाट शक्यता आहे. कारण वाकडमधली ही इमारत कधी ही खाली कोसळू शकते, अशी भीती स्थानिकांना आहे. त्यामुळं रात्री अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबत स्थानिकांनी कळवलं. प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन पाहून केली असता, स्थानिक म्हणतायेत तशीच परिस्थिती दिसली. महापालिका बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी ही येऊन पाहणी केली. बांधकाम वाय पद्धतीचे म्हणजेच चार ऐवजी दोन पिलरवर उभारण्यात आल्यानं अशी परिस्थिती उदभवल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. तळमजला अधिक तीन मजले या बांधकाम पद्धतीवर उभारणे जीवघेणे ठरणार, असा निष्कर्ष रात्री काढण्यात आलेला आहे. 


पोकलेनच्या साहय्याने सरळ केले 


इमारत पाडण्याचा किंवा कोणताही निर्णय तातडीनं घेणे शक्य नसल्यानं, तूर्तास इमारत पोकलेनच्या साहय्याने सरळ करण्याचे प्रयत्न करण्यात आलेत, तसेच खालून सपोर्ट ही देण्यात आला आहे. रात्री हे कामकाज थांबवण्यात आले असून आज महापालिकेत इमारत जमीनदोस्त करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.


रात्री वाकडमध्ये मोठा गोंधळ


पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड परिसरात ही इमारत झुकल्याचं कळताच परिसरांतील अनेक लोकांनी ही इमारत पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आजूबाजूच्या परिसरातील लोक घाबरलेल्या अवस्थेत होते. ही सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासनही या ठिकाणी दाखल झालं होतं. त्यासोबतच अग्निशमनदलाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं दाखल झालं होतं. लोकांनी गर्दी केल्याने पोलिसांना त्यांना आवरावं लागलं आणि त्यानंतर काम करणं शक्य झालं. शिवाय कोणत्याही माणसाला धोका होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. मात्र ही इमारत पाडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 


 



इतर महत्वाची बातमी-


एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ, ग्रॅज्यूटींच्या 1000 कोटींच्या रक्कमेचा भरणा केला नसल्याचा आरोप; एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष