एक्स्प्लोर
विजय दर्डांच्या घराबाहेर राडा, सचिवाच्या घराबाहेर बांगड्या फोडल्या

यवतमाळ : यवतमाळमध्ये काँग्रसे नेते विजय दर्डा यांच्या घरावर संतप्त नागरिकांनी हल्लाबोल केला. विजय दर्डा अध्यक्ष असलेल्या जवारलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये दोन शिक्षकांनी शाळकरी मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी यवतमाळमधील पालक आणि नागरिक एकत्र आले आणि त्यांनी दर्डांविरोधात घोषणाबाजी केली. एवढंच नाही तर स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रेरणास्थळावर तोडफोडही केली. संतप्त महिला पालकांनी किशोर दर्डा यांच्या घराबाहेर बांगड्या फोडल्या. किशोर दर्डा हे पब्लिक स्कूलचे सचिव आहेत. याप्रकरणी विजय दर्डा यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. काय आहे प्रकरण? विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी यवतमाळ पब्लिक स्कूलमधील दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अमोल क्षीरसागर आणि यश बोरूंदीया अशी ताब्यात घेण्यात आलेल्या शिक्षकांची नावं आहे. या दोन्ही शिक्षकांकडून मुलींचं लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार शाळेच्या विद्यार्थिंनीनी केली. हा धक्कादायक प्रकार समजताच संतप्त पालकांनी संपूर्ण शाळेला घेराव घातला. दरम्यान, शाळेचे संस्थाचालक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालक वर्गाकडून होतो आहे. पालकांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतलं आहे. तसंच शाळेचा पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
संबंधित बातमी
विद्यार्थींनीचं लैंगिक शोषण, दोन शिक्षक पोलिसांच्या ताब्यात
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















