एक्स्प्लोर

गणितासाठी आता ‘यारुकी’ तंत्रज्ञान, पंढरपुरातील शाळेची निवड

मुलांच्या मनात असलेली गणिताची भीती दूर होऊन त्यांना या विषयातील जिज्ञासा आणि आवड वाढीस लागेल, असा दावा या कंपनीकडून करण्यात आलेला आहे.

पंढरपूर : गणित हा विषय तसा अनेकांच्या नावडीचा. मात्र हाच विषय आवडीचा करण्यासाठी थेट जपान हा देश पुढाकार घेतो आहे. यासाठी ते आधुनिक पद्धतीचा वापर करणार आहेत. भारतात आधुनिक पद्धतीने गणित शिकविण्यासाठी जपानच्या ‘टोपान’ कंपनीने ‘यारुकी’ तंत्रज्ञान आणलं आहे. देशातील एकूण चार शाळांची निवड करण्यात आली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील लोटस इंग्लिश स्कुलचा समावेश आहे. या करारामुळे शाळेतील मुले आणि शिक्षक उत्साहित असून नव्या पद्धतीने गणितं शिकण्यासाठी आता मुलेही आतुर झाली आहेत. जपानच्या ‘टोपान प्रिंटिंग’ या कंपनीने अध्यक्ष शिंगो कनको आणि ‘लोटस’चे बब्रुवान रोंगे यांच्यात नुकताच हा करार झाल.  भारतातील ICSC, CBSC आणि राज्य महामंडळाच्या या चार शाळा असून, आपला अभ्यासक्रम जपानच्या आधुनिक तंत्रज्ञानाने सोपा करुन शिकवला जाणार आहे. मुलांच्या मनात असलेली गणिताची भीती दूर होऊन त्यांना या विषयातील जिज्ञासा आणि आवड वाढीस लागेल, असा दावा या कंपनीकडून करण्यात आलेला आहे. जपानच्या कंपनीने विकसित केलेल्या टॅब्लेटवर आधारित अभ्यास पद्धतीला यारुकी हे नाव देण्यात आले आहे. यात मुलांना प्रशिक्षण देऊन तीन महिने यावर काम करावे लागणार आहे. अभ्यासक्रम सुरु करण्यापूर्वी आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांची ऑनलाईन चाचणी घेतली जाईल. मुलांना देण्यात आलेल्या टॅबवरुन गणिताचा अभ्यास शिकवला जाणार असून त्यांचा घराचा अभ्यास देखील याच टॅबवर करावा लागणार आहे. हे सर्व टॅब ऑनलाईन जोडले गेल्याने शिक्षक कुठेही या मुलांच्या अडचणी सोडवू शकतील. यावरुनच त्यांचा केलेला अभ्यास देखील तपासला जाणार आहे. या तीन महिन्यातील मुलांच्या प्रगतीवरुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे. सुरुवातीला चौथीच्या वर्गासाठी हे प्रात्यक्षिक घेतले जाणार असून नंतर गणितासोबत शास्त्र विषयाचा देखील यात समावेश केला जाणार आहे. सध्या ‘यारुकी’ तंत्रज्ञान हे फक्त चौथीच्या वर्गासाठीच भारतात आणण्यात आलेले आहे. ‘लोटस’सारख्या ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना याचा चांगला फायदा मिळेल, अशी पालकांची देखील अपेक्षा आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget