एक्स्प्लोर
जळगावात 'दुपट्टा गँग'चा धुमाकूळ, चोरट्या महिला सीसीटीव्हीत कैद

जळगाव : जळगावात महिला चोरट्यांची टोळी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावरील एका कापडाच्या दुकानातून या टोळीनं हात साफ केला. या महिला टोळीची चोरी करण्याची खास पद्धतही समोर आली आहे. रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष जावू नये यासाठी चोरट्या महिलांनी शटरसमोर शाल आडवी धरली. त्यांच्या आडोशाला बसलेल्या दोन महिलांनी दुकानाचे शटर उचकवले. त्यानंतर एकीनं या दुकानात प्रवेश केला आणि 62 हजारांचा ऐवज लंपास केला. महिला चोरट्यानं दुकानाच्या आत बॅटरी लावल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसून आलं आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहा व्हिडीओ:
Before You Go
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















