सांगली : अतिक्रमण हटवणाऱ्या पथकाचा विरोध करण्यासाठी सांगलीतील एका महिलेने तिच्या हातगाड्यावरील कांदे बटाटे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टाकले. अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी शहरात रस्त्यावर हातगाड्या लावून तसेच रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. अनधिकृत फेरिवाल्यांविरोधात कारवाई सुरु करुन पालिकेने रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली होती. परंतु या मोहीमेला काही फेरिवाल्यांनी विरोध केला.

हातगाडीवर कांदे-बटाट्यांची विक्री करणाऱ्या महिलेने अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कारवाईला विरोध करण्यासाठी थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कांदे-बटाटे टाकले. कारवाई करण्यास आलेल्या पथकाला तिने तीव्र विरोध केला, परंतु अधिकाऱ्यांनी तिचे काहीच ऐकले नाही. त्यामुळे संतापलेल्या या महिलेने थेट महापालिका गाठली. तिथे जाऊन तिेने पालिकेच्या प्रवेशद्वारातच कांदे, बटाटे टाकून कारवाईचा निषेध केला.