महिलेने पतीच्या औषधांसाठी 10 टक्के व्याजानं एक लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. चक्रवाढ व्याजामुळे ही रक्कम तब्बल 5 ते 6 लाखांपर्यंत पोहोचली. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून त्यांनी सावकारांना व्याजही दिलं होतं.
एका सावकाराच्या कर्जाचं व्याज फेडण्यासाठी पीडितेनं दुसऱ्या सावकाराकडून कर्ज घेतलं, अशामुळे पीडित महिलेवर अनेकांच्या कर्जाचा डोंगर झाला. मात्र आता व्याजाचे हफ्ते थकल्याने सावकारांचे सतत फोन येऊ लागले. सावकारांच्या उद्धट भाषेमुळे महिलेने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.