एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकारविरोधात हक्कभंग दाखल करणार: विखे पाटील
मुंबई : फडणवीस सरकारविरोधात हक्कभंग दाखल करण्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा सभागृहात केली होती. मात्र त्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याचा दावा, विखे पाटलांचा आहे. त्यामुळेच त्यांनी सरकारविरोधात हक्कभंग आणण्याचा निर्णय घेतला आहे.
"अर्थसंकल्पीय अधिवेशनात 13 मार्च 2015 रोजी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी, शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्याबाबतची घोषणा केली होती. सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या 1 लाख रुपयांच्या मदतीत वाढ करुन ही मदत 5 लाख रुपयांपर्यंत देण्याचा निर्णय, खडसेंनी जाहीर केला होता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणीच झाली नाही", असा दावा विखेंनी केला.
माहिती अधिकारातून याबाबतची माहिती उघड झाल्याचं विखेंनी सांगितलं.
विखे पाटील म्हणाले, "हे सरकार घोषणांचा पाऊस आणि स्वप्नांची मालिका दाखविणारे आहे. निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने शेतक-यांच्या आत्महत्येबाबत पूर्णपणे असंवेदनशील भूमिका सरकारची उघड झाली आहे. सरकारच्या या खोटेपणाचा पर्दाफाश करण्यासाठी हक्कभंग दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे".
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement