Raju Shetti : साखर घोटाळ्यापेक्षा वीज वितरण कंपनीचा घोटाळा मोठा आहे. कोणत्या नेत्याचे कोणते कोणते प्रकल्प आहेत? हे लवकरच बाहेर काढणार असून वीज वितरण कंपनीचे सर्व घोटाळे बाहेर काढणार असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. 


राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. याबरोबरच वीज वितरण कंपनीला इशारा दिला आहे. राजू शेट्टी म्हणाले, सरकार  फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे सरकारवर आम्ही शंभर टक्के विश्वास ठेवणार नाही. या पूर्वी सरकारने फसवले आहे. त्यामुळे जन आंदोलन उभे करून सरकारला गुडघे टेकायला लावणार असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 
 
शेतकऱ्यांना मोफत वीज देणे हा शेतकऱ्यांचा मुलभूत अधिकार आहे. परंतु, तो अधिकार शेतकऱ्याला मिळत नाही. शेतकऱ्याला सर्पदंश झाला तर साप वन्यजीव नाही म्हणून शेतकऱ्याला मदत मिळत नाही.  परंतु, शेतकऱ्याने सापाला मारले तर वन्यजीव मारला म्हणून शेतकऱ्यावर कावराई होते. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यावर धरणे बांधली आणि विजनिर्मिती करण्यात आली.परंतु, याच शेतकऱ्यांना आज वीज मिळत नाही, अशी खंत राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली. सर्व माहिती गोळा करायचे काम सुरु असून या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले. 


दरम्यान, राजू शेट्टी यांनी यावेळी साखर कारखानदारांनाही इशारा दिला आहे. "शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा आहे, तोपर्यंत कारखानदारांना कारखाना बंद करता येणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 


राजू शेट्टी म्हणाले, "सहकार मंत्र्यांना काही स्टेटमेंट द्यायचे म्हटले तर त्यांना आधी बारामतीची परवानगी घ्यावी लागते. किसनवीर सहकारी साखर कारखाना बंद होण्या मागचे कारण नुसते त्यांना कर्ज फिरवून दिले नाही असे नाही तर त्यातील भ्रष्टाचार आणि नोकर भरतीसारखी अनेक कारणे आहेत. देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल की भाजपमध्ये आल्यामुळे किसनवीर सहकारी साखर कारखाना बंद पडला. परंतु, तो बंद पडू नये म्हणून तुमच्या ताब्यात मुंबईची जिल्हा बँक होती, त्यावेळी तुम्ही का सहकार्य केले नाही? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला. 


महत्वाच्या बातम्या