अंजली दमानिया यांनी ट्विट करुन ही मागणी केली आहे. खडसेंच्या जावयाची लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा दमानियांनी केला आहे.
"भाजप सरकार एकनाथ खडसेंच्या जावयाची MH 19 AQ 7800 ही अवैध सोनाटा लिमोझिन कार जप्त करणार का?" असा सवाल दमानियांनी केला आहे.
मात्र नंबरवरुन या कारची जळगाव आरटीओमध्ये नोंद झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे प्रथमदर्शनी त्या गाडीला परवाना मिळाल्याचं पासिंगवरुन दिसतं. मात्र तरीही ही कार अवैध असल्याचं दमानियांचं म्हणणं आहे.