विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटकांना उमेदवारी
एबीपी माझा वेब टीम | 17 May 2016 03:39 AM (IST)
मुंबई: विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाण्यातून महायुतीकडून शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसंत डावखरे यांना शिवसेनेच्या फाटकांचं कडवं आव्हान असेल. उमेदवारी भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. त्यामुळे रवींद्र फाटक आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेकडून शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे विधानपरिषद निवडणुकीसाठी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार म्हणून रवींद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.