एक्स्प्लोर

तूर खरेदीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई करणार : रणजीत पाटील

अकोला : तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने तुरीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेतंर्गत 22 एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर नोंद झालेली तूर खरेदीविना शिल्लक आहे, अशी तूर खरेदी करण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये, तसेच तूर खरेदीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले. तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत मोठया प्रमाणात तुरीची आवक झाली आहे. साठवणुकीसाठी समितीने 300 पोते तूर अकोला वेअर हाऊसकडे पाठवले. त्यापैकी 27 पोत्यातील तुरीची प्रत चांगली नसल्याचे कारण देत ते पोते परत तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत पाठविण्यात आले. चांगल्या प्रतीच्या तुरीमध्ये खराब तूर मिसळण्याच्या या प्रकरणी सचिवांनी अज्ञात व्यक्तींविरुध्द पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची रणजीत पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषी विरोधात कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश रणजीत पाटील यांनी दिले आहेत. बाजार हस्तक्षेप योजने अंतर्गत तूर खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या. मुंबई व दि विदर्भ सहकारी पणन महासंघ मर्या. नागपूर या संस्थांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खरेदी केंद्रावरील खरेदीविना शिल्लक असलेल्या तुरीचा पंचनामा करण्यासाठी संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. पारदर्शक पद्धतीनेच तुरीची खरेदी केली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget