Ratan Tata Cremation : जगविख्यात असूनही नेहमीच आपल्या साधेपणाने अवघ्या भारतीयांमध्ये आदराचं स्थान निर्माण केलेल्या टाटा समूहाचे माजी अध्यक्ष उद्योगमहर्षी रतन टाटा (Ratan Tata) यांनी बुधवारी (9 ऑक्टोबर) इहलोकीचा निरोप घेतला. आपल्याच घरातील कोणीतरी गेल्याची भावना प्रत्येक भारतीयामध्ये दिसून आली. आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी उसळली होती ती त्याचीच प्रचिती देत होते. उद्योगपती रतन टाटा पारशी समाजातून (Parsi rituals) असल्याने अंत्यसंस्काराचा कोणता मार्ग निवडला जाणार? याबाबत चर्चा रंगली होती. मात्र, रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळीमधील स्मशानभूमीमध्ये विद्यूत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पारंपारिक दख्माऐवजी (dakhma) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


कशी असते अंत्यसंस्कार प्रक्रिया? 


रतन टाटा यांचे पार्थिव प्रथम प्रार्थनागृहात ठेवण्यात आले. त्याठिकाणी पारशी परंपरेतील ‘गेह-सारणू’चे वाचन केलं जातं. रतन टाटा यांच्या पार्थिवाच्या तोंडावर कापडाचा तुकडा ठेवून 'अहनवेती'चा संपूर्ण पहिला अध्याय वाचला गेला. ही शांती प्रार्थनेची प्रक्रिया आहे. यानंतर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 


पारशी लोकांचा 'टॉवर ऑफ सायलेन्स' म्हणजे काय? ( Tower of Silence) 


पारशी लोकांचा पारंपारिक 'टॉवर ऑफ सायलेन्स' ( Tower of Silence) म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये गिधाडांसारख्या मांसाहारी पक्ष्यांसाठी मृतदेह सोडला जातो. रतन टाटा यांच्यावर अशा प्रकारे अंत्यसंस्कार न करण्याची कारणे काय आहेत?


रतन नवल टाटा कोणत्या पारशी समाजाशी संबंधित आहेत?


उत्तर : 7 व्या शतकात इराणला पर्शिया म्हणून ओळखले जात असे. तेव्हा तिथे ससानियन साम्राज्याचे राज्य होते आणि झोरोस्ट्रियन धर्म (Zoroastrian) हा तिथला राज्यधर्म होता. इराणचा शेवटचा सम्राट यझदेगार्द हा इसवी सन 641 मध्ये नेहावंदच्या लढाईत अरबांकडून पराभूत झाला. अरबांच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी पारशी तिथून पळू लागले. काही लोक खोरासानच्या डोंगरात जाऊन स्थायिक झाले. हे अत्याचार तिथेही थांबले नाहीत, म्हणून तेथून तीन बोटींमध्ये बसून गुजरातमधील काठियावाड येथील दीव बेटावर पोहोचले. येथून त्यांनी वलसाड गाठले. त्यानंतर गुजरातच्या या भागाचा राजा जाधव राणा यांनी काही अटींसह पारशी लोकांना येथे राहण्याची परवानगी दिली. जिथे पारशी लोकांनी संजन नावाचे छोटेसे शहर वसवले. पारशी समाज हा नंतर भारतातील सर्वात शिक्षित आणि श्रीमंत लोकांपैकी एक बनला. जगात पारशी लोकसंख्या दीड ते दोन लाख आहे, त्यापैकी 60 ते 70 हजार पारशी भारतात आणि 40 ते 45 हजार पारशी मुंबईत राहतात. 1940 मध्ये भारतातील पारशी लोकसंख्या 1 लाख होती, जी 2011 मध्ये 60 हजारांवर आली. 2050 पर्यंत त्यांची लोकसंख्या 40 हजारांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे.


पारशी समाजाच्या चमकणाऱ्या ताऱ्यांमध्ये उद्योगपती टाटा समूहापासून रॉकस्टार फ्रेडी मर्करीपर्यंत सर्वांचा समावेश आहे. फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी आणि भिकाजी कामा, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला, हे देखील पारशी होते.


प्रश्न - 2: पारशी लोकांच्या अंत्यसंस्काराची पारंपारिक पद्धत कोणती?


उत्तर : पारशी लोकांच्या अंत्यसंस्काराची परंपरा ३ हजार वर्षे जुनी आहे. पारशी लोकांच्या स्मशानभूमीला दख्मा किंवा 'टॉवर ऑफ सायलेन्स' म्हणतात. 'टॉवर ऑफ सायलेन्स' गोलाकार पोकळ इमारतीच्या रूपात आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, टॉवर ऑफ सायलेन्समध्ये मृतदेह धुऊन उघड्यावर सोडला जातो. पारशी लोकांच्या अंत्यसंस्काराच्या या प्रक्रियेला डोखमेनाशिनी म्हणतात. यामध्ये मृतदेह आकाशात दफन केले जातात (स्काय ब्युरिअल्स), म्हणजेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते टॉवर ऑफ सायलेन्समध्ये सूर्यप्रकाशात आणि मांसाहारी पक्ष्यांसाठी उघड्यावर सोडले जातात. 


प्रश्न - 3 : पारशी लोकांचे अंतिम संस्कार अजूनही असेच केले जातात की त्यात काही बदल झाले आहेत?


उत्तरः सामान्यतः पारशी समाज अंत्यसंस्कारासाठी टॉवर ऑफ सायलेन्समध्ये मृतदेह उघड्यावर ठेवला जातो. गिधाडांसारखे मांसाहारी पक्षी मृत शरीराचे मांस खातात, परंतु गिधाडांची लोकसंख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे पारशी समाजाचे म्हणजे दख्माचे अंतिम संस्कार करणे आता सोपं राहिलेलं नाही. तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांत गिधाडांच्या प्रजातींची लोकसंख्या सुमारे 99 टक्के कमी झाली आहे. गिधाडांची संख्या कमी होत असताना, मुंबईत राहणाऱ्या अनेक पारशींना त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रियजनांच्या मृतदेहाची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्याची चिंता होती. नव्या पिढीतील अनेक पारशींना त्यांच्या प्रिय व्यक्तीचा मृतदेह अनेक दिवस उघड्यावर पडावा, असे वाटत नाही.


प्रश्न - 4: पारशी लोकांकडे आता अंत्यसंस्काराचे कोणते पर्याय आहेत?


मुंबईतील पारशी लोकांकडे आता अंतिम संस्कारांसाठी 3 पर्याय आहेत. यामध्ये पारंपारिक दख्मा म्हणजेच टॉवर ऑफ सायलेन्सद्वारे अंतिम संस्कार करणे. दुसरा पर्याय मृतदेहाचे दफन करणे आणि तिसरा पर्याय मृतदेहांवर अंत्यसंस्कार. 


सायरस मिस्त्री यांच्यावरही विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार


वरळी येथील स्मशानभूमीत रतन टाटा यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यावर पारशी परंपरेऐवजी वरळीच्या विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पारशी धार्मिक शिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. रामियर पी करंजिया म्हणतात की सायरस मिस्त्री यांच्या वडिलांचा मृत्यू त्यांच्या मृत्यूच्या सुमारे दोन महिने आधी झाला होता. टॉवर्स ऑफ सायलेन्स येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


प्रश्न -5: जेआरडी टाटा यांची पारशींच्या अंत्यसंस्काराशी संबंधित स्टोरी आहे तरी काय?


उत्तरः मुंबईतील पारसी लोकांसाठी पर्यायी अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेसाठी पहिल्या प्रार्थनागृहाचा पाया 1980 मध्ये प्रसिद्ध उद्योगपती जेआरडी टाटा यांनी घातला होता. एक प्रार्थनागृह जेथे पारशी लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांचे दफन किंवा अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली जाते. 1980 च्या दशकात, त्यांचे भाऊ बीआरडी टाटा यांच्या निधनानंतर, जेआरडी टाटा यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त जमशेद कांगा यांना विचारले होते की त्यांच्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईतील कोणते स्मशान चांगले असेल. प्रसिद्ध उद्योगपती असल्याने त्यांच्या अंत्ययात्रेला अनेक मान्यवर येणार होते.


त्यावेळी, काही स्मशानभूमी बंद होती आणि त्यांची सुधारणा केली जात होती, तर काही जीर्ण अवस्थेत होती. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी दादरमधील स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली, पण जमशेद कांगा जेआरडी टाटा यांचे सांत्वन करण्यासाठी तेथे गेले तेव्हा त्यांना मुंबईतील स्मशानभूमीतील सुविधा अधिक चांगल्या असल्या पाहिजेत असे सांगण्यात आले.


'डिस्पोज ऑफ द डेड विथ डिग्निटी' मोहीम सुरू


मुंबईतील अनेक स्मशानभूमींपैकी वरळीतील एका स्मशानभूमीत बरीच जागा होती आणि दक्षिण मुंबईत असल्याने पारशी लोकांसाठी ते सोयीचे होते. जमशाद कांगा यांनी वरळीतच प्रार्थनागृह बांधण्याची योजना आखली, पण प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच त्यांची बदली झाली. जमशेद कांगा यांनी हे मिशन सोडले नाही आणि मुंबईतील प्रभावशाली पारसी लोकांसोबत त्यांनी 'डिस्पोज ऑफ द डेड विथ डिग्निटी' ही मोहीम सुरू केली आणि अंतिम संस्कारासाठी पर्यायी पद्धतीची मागणी केली. तेव्हा कांगा म्हणाली होते की, 'टॉवर ऑफ सायलेन्स' सिस्टम नीट काम करत नाही आणि आम्हाला पर्याय हवा आहे.'


पारशींसाठी स्मशानभूमी बांधण्याची मागणी जोर धरू लागली. टॉवर ऑफ सायलेन्सजवळ स्मशानभूमी बांधण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला होता, पण बॉम्बे पारसी पंचायत, किंवा बीपीपी, पारसी लोकांची सर्वात मोठी प्रतिनिधी संस्था, यांनी तो स्वीकारला नाही. पर्यायी अंत्यसंस्कार करणाऱ्यांना पारंपारिक पारशी लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला.


प्रत्यक्षात टॉवर ऑफ सायलेन्समधून मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्यांनाच तिथे बांधलेल्या प्रार्थनागृहात प्रार्थना करण्याची परवानगी होती. ज्यांनी इतरत्र मृतदेह दफन केले किंवा अंत्यसंस्कार केले त्यांना टॉवर ऑफ सायलेन्सच्या प्रार्थना हॉलमध्ये प्रवेश करण्यास मनाई होती. इतरत्र, दोन पारसी पुजारी ज्यांनी मृतदेह दफन केले आणि अंत्यसंस्कार केले त्यांना देखील प्रार्थना हॉलमधून प्रतिबंधित करण्यात आले. यानंतर 2015 मध्ये पारशींच्या एका गटाने महापालिकेसोबत मुंबईतील वरळी येथे पारसींसाठी स्मशानभूमी बांधली.


इतर महत्वाच्या बातम्या