मुंबई : खासदार इम्तियाज जलील यांच्या मुलांने लसीकरणावेळी 'वा मोदीजी वा' अशी अक्षर असलेले टी-शर्ट घातलं आणि चर्चा सुरू झाली. आम्ही बिलाल जलील याला गाठलं आणि त्याला विचारणा केली. एकीकडे वडील इम्तियाज जलील हे भाषणातून पंतप्रधान मोदींवर तुटून पडतात आणि तू मात्र लसीकरण करताना मोदींची स्तुती करणारा टी शर्ट घातला.
एकीकडे फडणवीसांचा पुतण्या आरोग्य विभागाचा फ्रंटलाइन वर्कर म्हणून लस घेतो आणि चर्चेत येतो. तर दुसरीकडे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचा मुलगा देखील लसीकरणावरून चर्चेत आहे. तो चर्चेत यासाठी आहे त्याने घातलेला टी-शर्ट. इम्तियाज जलील यांचा मुलगा बिलाल जलील हा आपल्या वडिलांसोबत औरंगाबाद शहरातील लसीकरण केंद्रावर पोहोचला. तेव्हा त्याने काळ्या रंगाचा एक टी शर्ट घातलेला होता. आणि त्यावर पांढर्या अक्षरात लिहिलेलं होतं वा मोदीजी वा. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तशी या फोटोवरून चर्चा सुरू झाली.
एकीकडे इम्तियाज जलील हे आपल्या खास शैलीत 'मोदीजी ओ मोदीजी' म्हणत भाषणात टाळ्या मिळवतात. त्यांचा मुलगा लसीकरणाच्या वेळी मोदीजींची प्रशंसा का करतोय? हा प्रश्न तुम्हाला जसा पडला तसा आम्हालाही पडला. आम्ही बिलालला गाठलं या टी-शर्ट विषयी विचारणा केली त्या वेळी त्याने उत्तर दिलं. "मी हा टी-शर्ट मोदींची स्तुती करण्यासाठी घातला नाही तर लसीकरणाबाबत चाललेल्या गोंधळ लोकांची धांदल उडालेली आहे त्या बद्दल उपरोधात्मकरित्या हा टी शर्ट घातला आहे."
सारकॅझिजम एक भाषा आहे. इंटेलिजंट कॉमेडीमध्ये ही येते. लसीकरण मोहिमेत उडालेल्या गोधळाची आलोचना आहे. आपल्या देशातल्या लोकांना लस मिळत नव्हती त्यावेळी इतर देशांना लस पाठवली जात होती. त्याच गोष्टीवरून मी 'वाह मोदीजी वाह' असं म्हणत होतो. कुणाल कामरा याने मोदींजीवर एक स्टॅंडर्ड सेट केला होता. त्यावेळी हा टी-शर्ट पहिल्यांदा पाहायला मिळाला आणि त्याने वाह मोदीजी वाह नारा लावला होता. खरंतर हा टी शर्ट घातल्यानंतर मला खूप फोन आले. तुम्ही मोदींना सपोर्ट का करता असं विचारणा झाली. त्यावेळी मी त्यांना हेच समजून सांगितलं आपण बोलतो वेगळा आणि त्याचा अर्थ वेगळा असतो हे शर्टच्या माध्यमातून मला सांगायचा आहे.
मोदींची आलोचना करताना मग तुम्ही सहकुटुंब लसीकरणासाठी कसे गेलात हा प्रश्न विचारल्यानंतर बिलाल यांनी सकारात्मक उत्तर दिलं. 'लस घ्यायला पाहिजे. आम्हाला काही लोक फॉलो करतात, त्यामुळे त्यांना एक चांगला संदेश जावा यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ही लस घेतली. मुस्लिम समाजामध्ये थोडसं लसी विषयीच्या साशंकता आहे. ती दूर होण्यासाठी देखील आम्ही एकत्र लसीकरणासाठी गेलो . माझं वय हे 45 पेक्षा कमी असतानाही मी लसीकरणासाठी यासाठी गेलो का तर परदेशात शिक्षणासाठी जाणार आहे. त्यामुळे मी ही लस घेतली आहे. असे बिलाल म्हणाला.