Maharashtra: राज्यात वीज बिल (Electricity Bill) थकित असल्यामुळं कृषी पंपाचं वीज कनेक्शन कापण्याची मोहीम ऊर्जा विभागानं हाती घेतलीय. दरम्यान, नुकतीच शेतात पेरणी केलेल्या गहू, उस, ज्वारी, हरभरा, ऊसाला पाणी देण्याचं काम सुरु आहे. मात्र, तरीही शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापलं जातंय. याविरोधात भाजपकडून आंदोलनं केली जात आहेत. यावर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. वीज फुकटात कधी पासून मिळायला लागली? कोळसा, पाणी यापासून वीज निर्मिती होते, त्याला पैसे मोजावे लागतात. वीज वापरतात मग वीज बिल भरायला का नको वाटतं? का नाईलाज आहे, असं त्यांनी म्हटलंय. 

 

"भाजपनं शेतकऱ्यांना सवय लावून ठेवलीय. ज्यामुळं अडचण निर्माण झालीय. महावितरणवर 56 हजार कोटीचा बोजा आलाय तो भरायचा कुठून?" असा सवाल नितीन राऊत यांनी भाजप नेत्यांना केलाय. "वीज बिल भरावंच लागणार आहे. फक्त यामध्ये मी माझ्या परीने सवलत देण्याचा प्रयत्न करतो, हप्तेवार पद्धतीनं भरता येऊ शकते जे आम्ही केलेले आहे. केंद्र सरकारचे दिल्लीतील नेते कशी टीका करतात हेच समजत नाही. केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी करण्याचे प्रयत्न केले नाही. क्रूड ऑइल चे दर कमी असताना ही त्यांच्याकडून प्रयत्न झाले नाही. लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे", असंही नितीन राऊत यांनी म्हटलंय.

 

इंधनाचे दर कमी करण्याबाबत केंद्र सरकार ने हा निर्णय घाययचा आहे का राज्यसरकरवर ढकलतात? भाजप शासित राज्य आहे त्यांनाच जीएसटीचा परतावा देतात? महाराष्ट्राला का देत नाही? महाराष्ट्रकडे बोट दाखवण्याचा काम का करतात? असाही प्रश्न नितीन राऊत यांनी विचारलाय.

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

हे देखील वाचा-