Ashish Shelar on West Bengal CM Mamata Banerjee Mumbai Visit : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या भेट होणार आहे. बुधवारी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची ममता बॅनर्जी यांची भेट झाली. पण ममता बॅनर्जींच्या दौऱ्यातील भेटीवर भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्य बैठकीत गुप्तता का बाळगली जातेय? बंगलप्रमाणे महाराष्ट्रात हिंसाचार घडवण्याचा कट नाही ना? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय.
ममता बॅनर्जी यांच्या पोटात एक आणि ओठात एक आहे. रोजगार निर्मिती व्हावी अशी आमची इच्छा आहे. पण राज्यातील उद्योग बाहेर घेऊन जात आहेत का? राज्यातील तरूणांना वडापाव विकायला लावणार आणि उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाणार आहात का? बंगला देशी लोकांशी तुमचं नातं काय आहे ? गुप्त बैठका का घेत आहेत? वाघीण म्हणून पाठराखण करत असाल तर त्रिपुरा येथे झालेल्या परभवाबद्दल रुदालीचा कार्यक्रम ठेवा, असा टोला अशिष शेलार यांनी लगावलय.
पश्चिम बंगालची जनता त्रस्त आहे. ममता बॅनर्जी यांनी टाटा यांना पिटाळून लावलं आहे. त्यांना शिवसेना पायघड्या घालत आहेत, असं वक्तव्य शेलार यांनी केलं आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
बंगालप्रमाणेच महाराष्ट्रही ED, CBI ला पुरून उरेल : ममता बॅनर्जी
Sanjay Raut Meets Mamata : ममता आणि संजय राऊत यांची ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये भेट, काय झाली चर्चा?
Aaditya Thackeray on Mamata Visit : "ममता यांचं स्वागत करणं ही महाराष्ट्राची संस्कृती": आदित्य ठाकरे
Mamata Banerjee Mumbai Visit : जय मराठी, जय बांगला; ममतांच्या दौऱ्याचा राजकीय अर्थ काय? ABP Majha