मुंबई: राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता (heavy rain again) वर्तवली आहे. महाराष्ट्रात ३ ते ७ ऑक्टोबरदरम्यान चक्रीवादळाचा इशारा जाहीर करण्यात आला आहे. आयएमडी ट्रॉपिकल सायक्लोन ॲडव्हायजरी क्र. ०३ नुसार ‘शक्ती’ चक्रीवादळाचा (cyclone Shakti) महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना धोका निर्माण होऊ शकतो. ३ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या भागांवर या वादळाचा परिणाम होण्याची शक्यता (heavy rain again) व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे. किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.(cyclone Shakti)
या संदर्भात महाराष्ट्र शासनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ट्रॉपिकल सायक्लोन अॅडव्हायजरी क्रमांक ०३ जारी करत महाराष्ट्रातील किनारपट्टी भागांसाठी चक्रीवादळ ‘शक्ती’चा उच्च ते मध्यम स्तरावरील इशारा दिला आहे. हा इशारा ३ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लागू असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना धोका संभवत असल्याचे सांगण्यात आले आहे.
cyclone Shakti: वाऱ्याचा इशारा
३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. झंझावाती वारे ६५ किमी प्रतितास वेगाने वाहू शकतात. चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यास या वाऱ्यांचा वेग आणखी वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
cyclone Shakti: समुद्र स्थिती
५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र अतिशय खवळलेला राहील. त्यामुळे मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
cyclone Shakti: पाऊस व पूरस्थिती
चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, मराठवाड्याचे काही भाग आणि उत्तर कोकण येथे तीव्र ढगांची निर्मिती होऊन आर्द्रतेचा प्रवेश वाढल्याने पूरस्थिती उद्भवू शकते. सखल भागांमध्ये पूर येण्याची शक्यता प्रशासनाने नाकारलेली नाही.
cyclone Shakti: तयारीसाठी सूचना
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनांना देण्यात आले आहेत. किनारपट्टी व सखल भागातील नागरिकांसाठी स्थलांतर योजना तयार ठेवण्यास सांगितले आहे. तसेच, जनतेसाठी सार्वजनिक सूचना जारी करत समुद्र प्रवास टाळावा आणि मुसळधार पावसात सुरक्षितता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.