Chandrakant Patil पुणे : पुण्यातील एका अपघाताप्रकरणी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला एका वाहनाने धडक (Gautami Patil Car Accident) दिली होती. ते वाहन गौतीमी पाटील हिच्या नावावर असल्याने पोलिसांनी गौतमी पाटीला या अपघातप्रकरणी नोटीस बजावली आहे. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी असून सामाजी विठ्ठल मरगळे असे त्याचे नाव आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावर कोथरूडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Call to DCP) यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत त दोषींवर कडक कारवाई करण्याची निर्देश दिलेत. त्यामुळे नोटीस बजावल्यानंतर आता गौतमी पाटीलवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मात्र असले तरी, गौतमी पाटील यांच्या वाहनाच्या अपघात प्रकरणात आक्रमक पवित्रा घेणारे हेच भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) मात्र कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात चकार शब्दही बोलत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न या निमित्याने विचारले जात आहे. (Chandrakant Patil on Gautami Patil Car Accident Case)
Gautami Patil Car Accident: पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बजावली नोटीस
पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ 30 सप्टेंबर रोजी एका हॉटेलसमोर एक रिक्षा उभी होती. त्यात रिक्षाचालकासह दोन प्रवासी होते. मागून आलेल्या गौतमी पाटीलच्या भरधाव कारनं उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यामध्ये रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघातात रिक्षाचालकासोबतच रिक्षातील दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले. पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
Allegations on Pune Police : पोलीस सहकार्य करत नाहीत, मरगळे कुटुंबीयांचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी, पहाटे 5 वाजता पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका भरधाव वाहनाने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे.
दरम्यान, गौतमी पाटील हिच्या कार चालकाची चूक असताना हा अपघात झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणाची गौतमी पाटीलच्या टीमकडून दखल घेण्यात आली नाही. तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही उपलब्ध होत नाही, पोलीस योग्य ते सहकार्य करत नाहीत असा आरोप आता रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी केलाय.
ही बातमी वाचा: