एक्स्प्लोर

राणे एनडीएत आल्यास त्यांचं स्वागत : रावसाहेब दानवे

नारायण राणे यांच्या पक्षाची ध्येय-धोरणं एनडीएसाठी अनुकूल असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करु, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद : ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी स्थापन केलेल्या नव्या पक्षाची ध्येय धोरणं अजून जाहीर केलेली नाहीत. मात्र त्यांच्या पक्षाची धोरणं एनडीएसाठी अनुकूल असतील तर त्यांचं एनडीएत स्वागत करु, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. यानंतर ते एनडीएत सहभागी होतील आणि त्यांच्या राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशीही शक्यता आहे. त्यावर आता रावसाहेब दानवेंकडूनही याबाबत संकेत देण्यात आले आहेत. राणेंना भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण नाही : दानवे राणेंचे काँग्रेसमध्ये मदतभेद होते. त्यामुळे ते पक्ष सोडल्यानंतर कुठे जातील, तर भाजपमध्ये जातील, अशी चर्चा रंगली होती. मात्र भाजपने त्यांना अधिकृतपणे पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं नव्हतं, असंही रावसाहेब दानवेंनी सांगितलं. दिल्लीत नारायण राणेंसोबत अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये राजकीय विषयावरही चर्चा झाली. पण राणेंना भाजपमध्ये येण्यासाठी पक्षाकडून निमंत्रण देण्यात आलं नव्हतं, असं दानवेंनी स्पष्ट केलं. शिवसेनेविरोधातलं अस्त्र म्हणून राणे एनडीएत? शिवसेनेविरोधात वापर करण्यासाठी राणेंना एनडीएत घेतलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र कुणाला उत्तर देण्यासाठी कुणाचा बळी आम्ही घेणार नाही. भाजपकडे सक्षम नेते आहेत, असं दानवेंनी स्पष्ट केलं. नारायण राणेंना एनडीएत घेतल्यास शिवसेना बाहेर पडणार- सूत्र नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला एनडीएत घेतलं तर शिवसेना बाहेर पडणार, अशी माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राणे एनडीएत दाखल होतील आणि त्यांना राज्यात मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांनी पक्ष स्थापनेची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी अधिक काळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केली. शिवाय शिवसेनेच्या नेत्यांशीही राणेंचं फारसं पटत नाही. त्यामुळे राणेंकडे मंत्रिमंद असताना शिवसेना मंत्री आणि राणे मांडीला मांडी लावून बसणार का, हा सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे. पाहा व्हिडिओ :

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget