एक्स्प्लोर

2014 ची फक्त पुनरावृत्तीच नाही, त्यापेक्षा जास्त जागा आणू : मुख्यमंत्री

सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 2014 पेक्षा जास्त यश मिळेल, असा दावा त्यांनी केला.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजप 2019 ची लोकसभा निवडणूक आणि राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकाही जिंकेल. आम्ही फक्त 2014 च्या निवडणुकांची पुनरावृत्तीच करणार नाही, तर त्यापेक्षा चांगली कामगिरी करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या मुलाखतीत त्यांनी सिंचन घोटाळा, आगामी निवडणुका, शिवसेनेसोबत युती आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती यावर उत्तरं दिली. युतीचा विश्वास शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला असला तरी आमची युती होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. ''शिवसेना हा आमचा जुना मित्र आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमची जुनी मैत्री आहे. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव, मुलायम सिंह आणि मायावती यांसारखे कट्टर शत्रू असलेले एकत्र येऊ शकतात, तर आम्ही का येऊ शकत नाही,'' असं मुख्यमंत्री म्हणाले. सध्या युतीबाबत कोणतीही चर्चा सुरु नाही. पण निवडणुका जवळ आल्यानंतर आम्ही युतीचा निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सरकारमध्ये असूनही शिवसेना सतत विरोध करत असते. पण याचा सरकारच्या कामकाजावर प्रशासकीयदृष्ट्या कोणताही परिणाम होत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मतभेद हे असू शकतात, पण ते आम्ही चर्चेतून सोडवतो. गेल्या चार वर्षात आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, जे आघाडी सरकारने 14 वर्षांच्या काळातही घेतले नव्हते, असंही मुख्यमंत्री म्हणाले. जलयुक्त शिवारचं समर्थन जलयुक्त शिवार योजना फोल ठरली असल्याच्या वृत्ताचं मुख्यमंत्र्यांनी खंडन केलं. राज्यात काही वर्षांमध्ये उत्पादन वाढलंय हे जलयुक्त शिवारचं यश असल्याचं ते म्हणाले. 2013-14 मध्ये 124 टक्के पाऊस पडूनही उत्पादन 137 लाख मेट्रिक टन होतं. 2016-17 मध्ये 97 टक्के पाऊस पडला आणि उत्पादन 223 लाख मेट्रिक टन होतं. 2017-18 मध्ये पाऊस 84 टक्के पडला आणि उत्पादन 180 लाख मेट्रिक टन होतं, असं म्हणत जलयुक्त शिवारने फायदा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्राचं पथक येणार आहे. केंद्र सरकारने दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यासाठी नियम ठरवलेले आहेत. पथकाने पाहणी केल्यानंतर केंद्र सरकारचा निर्णय होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सिंचन घोटाळा राज्यातील सिंचन प्रकल्पाची कामं वेगाने सुरु आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 40 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणलं आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचं काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण होईल. सिंचन घोटाळ्याची चौकशी कोर्टाकडून सुरु असून लवकरच सत्य समोर येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. भीमा कोरेगाव प्रकरण भीमा कोरेगाव प्रकरणी आणखी काही जण रडारवर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत ज्यांना अटक करण्यात आली त्यांच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत. अटक करण्यात आलेले संत नाहीत. देशामध्ये यांच्याकडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातं. ते भीमा कोरेगाव दंगलीत सहभागी नसतील, पण तशी परिस्थिती निर्माण करण्यामध्ये त्यांचा हात असू शकतो, अशी शंका मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केली. दरम्यान, सनातन संस्थेवर बंदीचा प्रस्ताव अगोदरच केंद्राकडे गेलेला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राने आणखी माहिती मागवली आहे. आम्ही केंद्राला सहकार्य करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. धनगर आरक्षणासाठी 'टिस'चा (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स) अहवाल सरकारला प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....';
Maharashtra Live blog updates: राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....';
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Sanjay Raut on PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी सलग दोन रात्री इन्स्टाग्रामवर फ्रंट कॅमेऱ्याने शूट करुन व्हिडीओ टाकले, संजय राऊत म्हणाले, 'ते कधीच तुमचे फ्रेंड होणार नाहीत'
पंतप्रधान मोदींनी सलग दोन रात्री इन्स्टाग्रामवर फ्रंट कॅमेऱ्याने शूट करुन व्हिडीओ टाकले, संजय राऊत म्हणाले, 'ते कधीच तुमचे फ्रेंड होणार नाहीत'
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
Embed widget