मुंबई :  राज्यात सौरऊर्जा पार्क (Solar Park) उभारण्यासाठी महानिर्मितीच्या एनटीपीसीसह कंपनी स्थापण्यास मान्यता देण्यात आली आहे. आजच्या  मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 


राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंतचे अल्ट्रामेगा  सौर ऊर्जा पार्क विकसित करण्याकरता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महानिर्मिती) 50:50 या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे.   ही संयुक्त  कंपनी राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागास राज्य सुकाणू अभिकरण  म्हणून घोषित करण्यात आले.


या समितीवर राज्य शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणाशी सुसंगत अशा बाबींचे पालन करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सौर ऊर्जा पार्कमधील प्रकल्पधारकाकडून एक रकमी शुल्क व वार्षिक संचलन व देखभाल शुल्क आदी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आले आहे


अपारंपरिक ऊर्जासाठी 17360 मेगावॅट क्षमतेच्या निर्मितीचे प्रकल्प 21 मार्च 2025 पर्यंत विकसित करण्यात येणार असून यापैकी 12930 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे.  राज्यात सध्या 9305 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित असून 2123  मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. राज्यात सौरऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मितीच्या एनटीपीसीसह कंपनी स्थापण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.


संबंधित बातम्या :