एक्स्प्लोर

...म्हणून आम्हाला वेगळा विदर्भ हवा : श्रीहरी अणे

‘महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले पण विदर्भाचा विकास कुणीही केला नाही. त्यामुळे आम्हाला वेगळा विदर्भ हवा आहे’

नागपूर : ‘महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले पण विदर्भाचा विकास कुणीही केला नाही. त्यामुळे आम्हाला वेगळा विदर्भ हवा आहे’, अशी मागणी श्रीहरी अणे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर त्यांनी हे विधान केलं आहे.  वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर शरद पवार काय म्हणाले होते? राज ठाकरे - थोड्या वेगळ्या विषयाकडे जातो. वसंतराव नाईक 11 वर्षे, सुधाकरराव नाईक अडीच वर्षे, कन्नमवार दीड-एक वर्षे आणि आज देवेंद्र फडणवीस साधारण तीन-साडेतीन वर्षे, इतके मुख्यमंत्री विदर्भातून महाराष्ट्राला लाभल्यानंतरही विदर्भ स्वतंत्र व्हावा, अशी मागणी का होते? शरद पवार - त्याचा इतिहास थोडा वेगळा आहे. आपण या परिसरात वाढलेलो, इकडचं सामाजिक वातावरण आणि तिकडच्या गोष्टींमध्ये फरक आहे. मराठवाड्यामध्ये अनेक वर्ष निजामाचे राज्य होते. मराठवाड्याच्या लोकांमध्ये निजामाच्या राजवटीसंदर्भात आकस होता, नाराजी होती आणि त्यांच आकर्षण उर्वरित महाराष्ट्राकडे होतं. त्यामुळे मराठवाड्यात कुणी म्हटलं की, 'स्वतंत्र मराठवाडा करा' तरी त्याला प्रतिसाद मिळत नाही. विदर्भाची परिस्थिती थोडी वेगळी आहे. नागपूर ते अकोल्याचा जो भाग आहे, तो एकेकाळी मध्य भारताचा भाग होता. मध्य भारत नावाचं स्वतंत्र राज्य होतं. त्या राज्याची भाषा हिंदी होती. त्यामुळे हा संबंध हिंदी भाषिकांचा प्रदेश होता. त्याच्यातही दोन भाग आहेत, वर्धा, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, अकोला आणि वाशिम हा मराठी भाषिक याला वऱ्हाड म्हणतात आणि नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया याला विदर्भ म्हणतात. आजही त्या भागात गेलो, तरी तिथे हिंदी बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. राज ठाकरे - मग विदर्भ स्वतंत्र व्हायची जी मागणी होते आहे, ही चार जिल्ह्यांची आहे फक्त? शरद पवार - प्रामुख्याने तिथली आहे. त्याचेही नेतृत्त्व करणारा माणूस फार कमी आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा माणूस मूलत: मराठी माणूस नाही. तो अन्य भाषिक आहे. त्याला हिंदीबद्दलची आस्था आहे. त्याला सातत्याने वाटतं की, वेगळं राज्य आलं, तर हे नेतृत्त्व आपल्या हातात येईल. आज एकसंध महाराष्ट्र झाल्यामुळे वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले. जर उद्या विदर्भ वेगळा झाला, तर त्याच्या नेतृत्त्वाचे वाटेकरी म्हणून अमराठी माणूस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे स्वप्न ज्यांच्या मनात आहे, त्यांचा आग्रह आहे. पण तिथला मराठी माणूस स्वतंत्र विदर्भाच्या बाबतीत मनापासून पुरस्कर्ता नाही. मी मात्र तिथे भूमिका स्पष्ट केली की, तुम्हाला हवे असेल तर लोकमत सिद्ध करावं. पण लोकमत कुणी घ्यायला तयार नाही, कारण त्यांना माहित आहे लोकमत त्यांना मिळणार नाही. VIDEO : संबंधित बातम्या : दाऊदबाबतच्या आरोपांवर शरद पवार काय म्हणाले? राज ठाकरेंच्या ‘रॅपिड’ प्रश्नांवर शरद पवारांची ‘फायरिंग’ आरक्षण आर्थिकदृष्ट्या असावं, मग तो कुठल्याही जातीचा असो : पवार मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही : शरद पवार राज ठाकरेंनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत जशीच्या तशी...

राज ठाकरेंचे तुफान प्रश्न, शरद पवारांची सडेतोड उत्तरं

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके

व्हिडीओ

Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget