‘We Together’ समितीचे आवाहन
'मी-टू'च्या चळवळीने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. ही चळवळ फक्त अभिनेत्री व इतर प्रसिद्ध व्यक्तींपूर्ती मर्यादित न ठेवता सामान्य कुटुंबातील महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी भूमिकाय समितीच्या सदस्यांनी मांडली असून, “सामान्य कुटुंबातील व ग्रामीण भागातील महिलांवर सामाजिक दडपण असते त्यामुळे त्या सोशल माध्यमांवर व्यक्त होतीलच असे नसते. ज्या मुलींवर काही अत्याचार होत आहे व ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी या समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा.”, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो : ‘We Together’ समितीचे सदस्य
“काही मुलींचे फोन मला आले होते. त्यांना या विरोधात आवाज उठवायचा होता. पण कोणता मार्गाने आपण पुढे जाऊ शकतो याची स्पष्टता त्यांना नव्हती. या कारणास्तव आम्ही सगळ्यांनी येऊन अशा मुलींना मदत करण्यासाठी व त्यांना व्यक्त होण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे.”, असे ‘We Together’ समितीच्या सदस्या कल्याणी माणगांवे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
महत्त्वाचं म्हणजे, मदत करत असताना पीडितेची कोणतीही ओळख जाहीर केली जाणार नाही. जेणेकरुन पीडितेला कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.
लैंगिक अत्याचारासंबंधी तक्रार असल्यास ‘We Together’ समितीच्या सदस्यांशी थेट संपर्क करता येईल. त्यासाठी संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे :
- कल्याणी माणगांवे - 7507612037
- मृदगंधा दीक्षित - 9404700738
- शर्मिला येवले- 7038443776
- स्वाती कांबळे -7387723184
- सारिका आखाडे -9921720354
- दीपक चटप-9130163163
- भूषण राऊत- 9823183820
- आदर्श पाटील- 8806336033
- नितीन जाधव-7218415177
चळवळीत सहभागासाठीही आवाहन
अत्याचार पीडित स्त्रियांना मदत करण्याच्या चळवळीत सहभागी होण्यासाठीही आवाहन ‘We Together’ समितीकडून करण्यात आले आहे. ज्यांना या समितीशी जोडून घ्यायचे असेल, तर 7038443776 या नंबरवर ‘#WeToo’ असा हशटॅग वापरुन आपलं नाव व जिल्हा व्हॅटसअप करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी फेसबुक पेज तयार करुन, तिथेही संपर्क साधता येणार आहे.