एक्स्प्लोर
ठाणे शहराचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार

ठाणे : ठाणे शहरात स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे. या काळात ठाणे महापालिका स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून शहरात पाणी पुरवणार आहे. पाणी पुरवठा कधी बंद राहील? स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक 10 मार्च 2017 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून शनिवार दिनांक 11 मार्च 2017 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. कुठल्या भागात पाणी पुरवठा बंद? शुक्रवारी सकाळी 9 पासून रात्री 9 पर्यंत शहरातील घोडबंदर रोड, गांधीनगर, वसंतविहार, उन्नति गार्डन, सुरकरपाडा, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, इत्यादी परिसरात पाणी पुरवठा बंद राहाल व शुक्रवारी रात्रौ 9.00 ते शनिवार सकाळी 9.00 पर्यंत समतानगर, ऋतुपार्क, सिध्देवर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहील. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करुन पालिकेस सहकार्य करावं, असं आवाहन पाणी पुरवठा विभागाने केलं आहे.
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















