Todays Weather Maharashtra: राज्यात आज बहुतांश जिल्ह्यात वादळी वारा, मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खास करून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात हा पाऊस होण्याची शक्यता आहे. 


हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण जरी असले तरी मोठ्या प्रमाणात तापमान देखील वाढले आहे. मुंबईत आणि ठाण्यात उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. मुंबईत 33 °C, तर ठाण्यात 36°C तापमानाची नोंद झाली आहे.


वाशीममध्ये 42.2 °C कमाल तापमानाची नोंद-






कोणत्या जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट?
 
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदर्ग, सोलापूर, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ


विदर्भात ढगाळ वातावरण-


चंद्रपूर, गडचिरोली आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोलीमध्ये देखील वाऱ्यासह ढगाळ वातावरण राहील.






यवतमाळ हलक्या स्वरूपाच्या गारासह विजेच्या कडकडासह वादळी पाऊस-


वेधशाळेने जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या स्वरूपात गारा पडण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, मारेगाव, वणी, कळंब, राळेगाव तालुक्यात ढग दाटून येऊन पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे प्रचंड उकड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वणी तालुक्यातील आकापुर शेत शिवारात बैलाच्या अंगावर वीज पडल्याने बैल जागीच मृत्यू झाला. मारेगाव आणि कळंब तालुक्यातील काही भागांमध्ये हलक्या गारासह पाऊस पडला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस दिवसाकरिता ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त केल्या गेला आहे.


सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचं मोठे नुकसान-


गेल्या चार दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे सोलापुरात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.  उत्तर सोलापूर तालुक्यात झालेल्या वादळ वाऱ्यामुळे मार्डी गावात काढणीला आलेला आंबा उध्वस्त झाला आहे. हाताला आलेली अनेक पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. मार्डीतील बाळासाहेब पाटील या शेतकऱ्याचे तब्बल 550 आंब्याची झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.